एच. टी. बियाण्यांविरोधात कृषी विभागाचे व्यापक धोरण
एच. टी. बियाण्यांविरोधात कृषी विभागाचे व्यापक धोरण 
मुख्य बातम्या

एच. टी. बियाण्यांविरोधात कृषी विभागाचे व्यापक धोरण

टीम अॅग्रोवन

नागपूर  : येत्या हंगामात एच. टी. बियाण्यांचा प्रसार होऊ नये, याकरिता कृषी विभागाकडून व्यापक अभियान हाती घेण्यात आले आहे. एच. टी. बियाणे असलेल्या ठिकाणची माहिती मिळताच थेट पोलिसांना घेऊन छापेमारी करण्यासोबतच भिंतीपत्रकाच्या माध्यमातून, असे अवैध व पर्यावरणविरोधी बियाणे न वापरण्यासंदर्भाने जागृतीही केली जात आहे. 

गेल्यावर्षीच्या हंगामात यवतमाळसह राज्यात मोठ्या प्रमाणावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच. टी. बियाण्यांची अवैधरीत्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती. आंध्र प्रदेश, तेलंगाणा तसेच गुजरात राज्यातून या बियाण्यांचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. या हंगामात एच. टी. बियाणे अवैधरीत्या शेतकऱ्यांपर्यंत पोचणार नाही, याकरिता कृषी विभाग सावध पावले उचलत आहे. भिंतीपत्रक, घडीपत्रिका अशा साहित्याच्या माध्यमातून गावोगावात जागृती अभियान राबविले जात आहे. कृषी विभागाच्या गावपातळीवरील कर्मचाऱ्यांची या कामी मदत घेतली जात आहे. 

छापेमारीचा प्रयत्न फसला बिटी बियाण्यांचा साठा असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापेमारी करण्यावर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण शाखेकडून भर दिला गेला आहे. त्यानुसार यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्‍यातील एका गावात एच. टी. बियाणे असल्याचे समजल्यानंतर छापेमारी करण्यात आली. गुणनियंत्रण विभागाच्या दोन पथकाकडून पोलिसांच्या मदतीने ही छापेमारीक झाली. परंतु यात काहीच हाती लागले नसल्याची माहिती आहे. छापेमारीत काहीच हाती लागले नसले तरी गावातील नागरिकांची बैठक घेत त्यांचे एच. टी. बियाण्यांबाबत प्रबोधन करण्यात आले. 

अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना फोन अकोला जिल्ह्याच्या अकोट व बार्शीटाकळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना फोनव्दारे एच. टी. बियाणे बुकींगबाबत विचारणा केली जात असल्याची  माहिती आहे. १९०० रुपयांत हे बिटी पाकीट असून हे खरेदी केल्यास त्यावर कीडरोग आणि तण येणार नाही, असा दावा संबंधीत व्यक्‍ती करीत असल्याचे सांगितले जाते. कृषी व्यवसायिकानेच याबाबत माहिती दिली. त्यानंतर कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाकडून या प्रकारातील सत्यता पडताळण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT