साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त
साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त 
मुख्य बातम्या

साडे सत्तावीस हजार ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

Suryakant Netke

नगर ः स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यात आतापर्यंत सुमारे २७ हजार ६१६ ग्रामपंचायती आणि तेहतीस जिल्ह्यांमधील ३४४ तालुके हागणदारीमुक्त झाले आहेत. गडचिरोली जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये शौचालयांची शंभर टक्के कामे पूर्ण झाली असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचा अहवाल सांगतो आहे. 

सात वर्षांपूर्वी शौचालये बांधकाम व वापराबाबत झालेल्या सर्व्हेनुसार (बेसलाइन) हागणदारीमुक्तीची टक्केवारी जाहीर केली असल्याचे सांगण्यात येत आहे. नगर जिल्ह्यामधील सर्वच्या सर्व चौदा तालुके आणि १३११ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. 

सामान्य कुटुंबाने वैयक्तिक शौचालय बांधावे, यासाठी त्यांना बारा हजारांचे अनुदान दिले जात आहे. याबाबत प्रबोधन करण्यासाठी गावपातळीवर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, महिला बचत गटांची मदत घेतली जात आहे. पाणीयोजनांसह गावपातळीवर विविध योजनांसाठी शौचालयांची कामे बंधनकारक केली आहेत. त्यामुळेही या कामांची संख्या वाढत आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावे हागणदारीमुक्त करण्यावर भर दिला असून, गाव हागणदारीमुक्त नसेल, तर सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यात गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ जोरात राबवले. आता राज्य हागणदारीमुक्त होण्यासाठी फक्त ५२ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त होणे शिल्लक आहे. 

बेसलाइनमध्ये नावे नसलेल्यांचे काय ? केंद्र सरकारने सात वर्षांपूर्वी शौचालयाबाबत बेसलाइन सर्वेक्षण केले होते. त्यानुसार ज्यांच्याकडे शौचालये नाहीत अशा कुटुंबांची यादी तयार केली. त्यानुसारच बारा हजारांचे अनुदान शौचालय बांधणीसाठी दिले. त्या यादीनुसारच हागणदारीमुक्ती जाहीर केली. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक कुटुंबांकडे शौचालये नसूनही शंभर टक्के हागणदारीमुक्ती जाहीर केली जात आहे. मात्र, ज्याची नावे बेसलाइन सर्व्हेत नाहीत आणि शौचालयेही नाहीत त्यांचे काय असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. एकट्या नगर जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस हजार कुटुंबांची नावे यादीत नाहीत आणि शौचालयेही नाहीत. अजूनही राज्यात शौचालये नसलेल्या कुटुंबांचा आकडा लाखाच्या वर आहे.

अशी आहे स्थिती      हागणदारीमुक्त जिल्हे ः ३३      तालुके ः ३४४      राज्यातील ग्रामपंचायती ः २७ हजार ६६८      हागणदारीमुक्त ग्रामपंचायती ः २७ हजार ६१६      एकूण कुटुंबे ः १ कोटी १० लाख ६८ हजार ४७०      शौचालये असलेली कुटुंबे ः १ कोटी १० लाख ६७ हजार ८७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT