संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात मुगाची काढणी झाल्यावर कृषी अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे

टीम अॅग्रोवन

पुणे  ः मूग पिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याच्या निर्मूलनाबाबत शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज होती. मात्र शिरूर तालुक्यातील कृषी विभागाचे अधिकारी प्रादुर्भावग्रस्त शेतांकडे फिरकले नाहीत. अखेर कोणी येईना, म्हणून शेतकऱ्यांनी मुगाची काढणी करून नवीन पिकांचे नियोजन करण्यास सुरवात केली. शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत आवाज उठवण्याचा इशारा दिल्यानंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांविषयी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुक्यात मुगाचे सरासरी आठ हजार ६९ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी सुमारे १३ हजार ३८३ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली आहे. मात्र, अनेक भागांत मूग पीकवाढीच्या अवस्थेत असताना त्यावर कीड - रोगांचा प्रादुर्भाव झाला. कीड - रोगांमुळे पिकाचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन करण्याबाबत मागणी केली होती. मात्र तरीही एकही अधिकारी शेतांकडे फिरकला नाहीत. मुगाची काढणी केल्यानंतर उत्पादनात घट आल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौऱ्यांचे नियोजन केले. मात्र, मूग पिकाचे मोठे नुकसान झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात नवीन पिकांचे नियोजन करण्याच्या उद्देशाने मुगाची काढणी केली आहे. त्यानंतर कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या शेतात पोचत असल्याचे दिसून येते.  

शिरूर तालुक्यातील केंदूर येथील शेतकरी सतीश साकोरे म्हणाले, की केंदूर, पाबळ, धामारी, खैरेनगर या भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मुगाची पेरणी केली होती. त्यातच कमी पावसामुळे पिके वाया गेली आहेत. रोग किडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यासाठी कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज होती. परंतु प्रत्यक्षात कृषी विभागाचे एकही अधिकारी फिरकले नाहीत. रोग किडींमुळे मुगाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी दुसरे पीक वेळेत घेण्यासाठी या मुगाची काढणी केली आहे. त्यातच मुगाचे उत्पादन घटल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कृषी विभागाचे कर्मचारी पाहणी करण्यासाठी येत आहेत.

हे कर्मचारी मुगाचे असलेले एकूण क्षेत्र, मिळत असलेले उत्पादन आणि झालेले नुकसान यांची माहिती एका कागदाच्या चार्टमध्ये भरून घेत आहे. त्यानंतर ती माहिती शासनाला पाठविणार असल्याचे सांगत आहेत.    

जास्त पावसामुळे लाखेवाडी परिसरात मुगाचे नुकसान झाले आहे. ते किती टक्के आहेत, हे सांगता येणे कठीण आहे. काही ठिकाणी आम्ही  मूग पिकाची पाहणी केली आहे. त्यासंदर्भात शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तालुकास्तरावरून पंचनामे करण्याच्या सूचना नसल्याने त्याचे पंचनामे करता येत नाहीत असे मंडळ कृषी अधिकारी सुवर्णा आदक यांनी सांगितले.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT