संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तीन कोटींच्या बोगस निविष्ठा जप्त

टीम अॅग्रोवन

पुणे  : कृषी विभागाने राज्यातील भेसळयुक्त निविष्ठानिर्मिती करणाऱ्यांवर धाडी टाकल्या. यामधील निविष्ठांच्या नमुन्यांचे अहवाल अप्रमाणित निघाले आहेत. त्यामुळे अखेर भेसळखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तीन कोटींपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे. कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी स्वतः या कारवाईवर लक्ष ठेवले होते. 

गुण नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे, उपसंचालक सीताराम कोलते व तंत्र अधिकारी राजेंद्र साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. राज्याच्या विविध भागांत १५ व १६ मार्चला संशयास्पद निविष्ठा जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, गुन्हे दाखल होत नसल्याने चर्चेला उधाण आले होते. आयुक्तांनी मात्र कायद्यानुसार कारवाई पूर्ण करण्याच्या सूचना दिल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोचले आहे. या कारवाईमुळे मात्र बोगस विद्राव्य खते आणि मिश्रखतांच्या टोळ्या कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. 

पश्चिम महाराष्ट्रातील भेसळखोरांवर पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या ४२०, ४६५, ४७१, ३४ कलमान्वये तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्याच्या तीन आणि सात कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यात श्‍याम व्यंकप्पा गवंडा (सातारा), सरदार श्‍यामराव कचरे (कोल्हापूर), संजय दिलीपराव पाटील (सांगली) आणि आल्पी कारदार लोबो (कोल्हापूर) अशा पाच जणांचा समावेश आहे.  सातारा जिल्ह्यात असलेल्या सेविओ बायोऑरगॅनिक्स ॲन्ड फर्टिलायझर्सकडून या बोगस निविष्ठांचा पुरवठा केला जात होता. कंपनीचे केमिस्ट विजयसिंह कृष्णराव राऊत यांनी कृषी अधिकाऱ्यांना आमच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे उत्तर दिले. मात्र, गोदामाची झडती घेतली असता ५० किलो पिशव्यांमध्ये बोगस मिश्रखतांचा मोठा साठा आढळला. या भेसळखोरांवर खत नियंत्रण आदेश १९८५ मधील सहा कलमेदेखील लावण्यात आलेली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

पश्चिम महाराष्ट्रातील सेविओ बायोऑरगॅनिक्सचे लागेबांधे विदर्भातदेखील आहेत. मात्र, विदर्भात वेगळ्या टोळीकडून बोगस कीटकनाशकांचा पुरवठा केला जात होता. त्याचे केंद्रस्थान अकोला होते. पोलिसांनी कीटकनाशक कायदा, खत नियंत्रण आदेश तसेच भारतीय दंड विधानाच्या ४२० कलमान्वये औरंगाबादच्या सूर्यकांत मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.  इशिता आणि कोमकोज कंपन्या संशयास्पद कर्नाटक ते महाराष्ट्र अशा पद्धतीने विदर्भात संशयास्पदपणे विद्राव्य खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचा पुरवठा होतो आहे. या कंपनीने सूक्ष्म मूलद्रव्य विक्रीसाठी नागपूरच्या इशिता इंटरनॅशनल या नावाने तर कीटकनाशकांसाठी केमकोज नावाने परवाना घेतला आहे. मात्र, उत्पादनाच्या पॅकिंगवर या नावांचा उल्लेख केला जात नाही. या ठिकाणी परवाना नसलेली सात कीटकनाशके आढळली आहेत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT