dada bhuse  
मुख्य बातम्या

आश्‍वासनानंतर कृषी विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

सातवा वेतन आयोग व दहा, वीस व तीस वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू होते.

टीम अॅग्रोवन

 नगर ः सातवा वेतन आयोग व दहा, वीस व तीस वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरू होते. मंगळवारी (ता.१०) कृषिमंत्री दादा भुसे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मागण्या लवकर मार्गी लागाव्यात यासाठी दिवाळीनंतर बैठक होणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग व दहा, वीस व तीस वर्षांनंतरची आश्वासित प्रगती योजना लागू करावी या मागणीसाठी पंधरा दिवसापासून कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होते. त्यावर मंगळवारी (ता.१०) कृषिमंत्री दादा भुसे व कृषी सचीव एकनाथ डवले यांच्यासह खासदार विनायक राऊत, राजन विचारे, योगेश कदम, आमदार नितीन देशमुख, यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. चिंतामणी देवकर, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. विठ्ठल नाईक, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. संजय कोकाटे, व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापाठीच्या कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप मोरे यांच्यासह काही प्रतिनिधी उपस्थित होते.  कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करून मागण्या तातडीने मार्गी लावण्याचे भुसे यांनी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे समन्वय संघाने जाहीर केले असे डॉ. चिंतामणी देवकर यांनी सांगितले. दिवाळीनंतर पुन्हा बैठक घेऊन मागण्या लवकर कशा सोडवता येतील याबाबत चर्चा होणार आहे. कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे घेतल्याने कृषी विद्यापीठातील कामकाज आजपासून (ता.११) सुरळीत होणार आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Heatwave: कोकणात उकाडा वाढला; विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा चटका वाढला

Tanta Mukti Committee: गावागावांतील ‘तंटामुक्ती’ कागदावरच

Biometric Attendance: ग्रामपंचायतींमध्ये बायोमेट्रिक अनिवार्य

Wheat in Summer: उन्हामुळे गव्हाचा दाणा बारीक? तातडीने करायच्या ३ उपाययोजना

Veterinary Doctors Protest: पशुवैद्यक कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली; १० मार्चला सामूहिक राजीनाम्याचा इशारा

SCROLL FOR NEXT