custard apple  
मुख्य बातम्या

महानोरांच्या सीताफळ बागेची कृषी सचिवांनी केली पाहणी

तालुक्याच्या सीताफळाचा गोडवा सर्वदूर पसरत असताना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पळसखेड (ता.सोयगाव) येथील निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या सीताफळ बागेला नुकतीच भेट देवून पाहणी केली.

टीम अॅग्रोवन

सोयगाव, जि. औरंगाबाद ः तालुक्याच्या सीताफळाचा गोडवा सर्वदूर पसरत असताना राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी पळसखेड (ता.सोयगाव) येथील निसर्ग कवी ना. धो. महानोर यांच्या सीताफळ बागेला नुकतीच भेट देवून पाहणी केली. कृषी सचिवांच्या दौऱ्यात निसर्ग कवी ना.धो. महानोर यांनी सीताफळ लागवडीपासून ते उत्पन्नापर्यंत प्रवासाची माहिती दिली. यावेळी कृषी सचिव डवले यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून झालेल्या विविध कामांची पाहणी करून सोयगाव तालुक्याचे अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्याची सूचना तालुका कृषी विभागाला केली. यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार योजनांच्या झालेल्या कामांचा आढावा घेऊन पाहणी केली. शेततळे, नाले खोलीकरण आदी कामांची पाहणी केली.  यावेळी निसर्ग कवी ना.धो. महानोर यांनी कृषी सचिव एकनाथ डवले यांना सीताफळ भेट दिले. उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, कृषिभूषण रवींद्र पाटील, दिलीप पाटील, तालुका कृषी अधिकारी संगीता पवार, मंडळ कृषी अधिकारी संपत वाघ, दीपक बिऱ्हारे, कविता अहिरराव आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Manure Price Hike: खानदेशात शेणखत महागले; पशुधन घटले, दरात ५ ते ७ टक्क्यांची वाढ

Heavy Rain: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर; बारामतीला मुसळधार पावसाने झोडपले

Cotton Shredder: पऱ्हाटीच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते कॉटन श्रेडर

Sugarcane Rate Dispute: उसाला प्रतिटन ३,८५० रुपयांचा तोडगाही अमान्य; शेतकरी ५ हजारांवर ठाम

Maharashtra Drought Situation: दुष्काळी प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांना निवेदन मोहीम

SCROLL FOR NEXT