चंद्रपूरला कृषी विद्यापीठाऐवजी आता कृषी महाविद्यालय
चंद्रपूरला कृषी विद्यापीठाऐवजी आता कृषी महाविद्यालय 
मुख्य बातम्या

चंद्रपूरला कृषी विद्यापीठाऐवजी आता कृषी महाविद्यालय

टीम अॅग्रोवन

चंद्रपूर : कृषी संशोधन, विस्ताराला चालना मिळावी याकरिता स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्री तसेच मुख्यमंत्री दोघेही स्वतंत्र कृषी विद्यापीठाकरिता आग्रही होते. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश होतो. पूर्व विदर्भातील धान उत्पादकांना न्याय देण्यात हे विद्यापीठ अपयशी ठरल्याचा आरोप होत. पूर्व विदर्भातील धान उत्पादकांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी झाली. त्यानंतर कृषीऐवजी वनविद्यापीठाचा पाठपुरावा करण्यात आला. हे दोन्ही प्रस्ताव मागे पडल्यानंतर आता कृषी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.  वर्षाला ६० विद्यार्थी क्षमता या महाविद्यालयाची राहील. मूललगतच्या मारोडा, सोमनाथ येथे विद्यापीठाच्या मालकीची ६१.८० हेक्‍टर जमीन उपलब्ध आहे. यापैकी ४१.८० हेक्‍टर जमीन कृषी महाविद्यालयासाठी उपलब्ध होऊ शकते. कृषी महाविद्यालयाकरिता प्रयोगासाठी लागणाऱ्या ३० हेक्‍टर जागेची देखील यातून गरज भागेल, असा मतप्रवाह मांडला जात आहे.  सद्य:स्थितीत पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांसाठी केवळ दोनच घटक महाविद्यालये आहेत. चंद्रपुरात होणाऱ्या या नव्या कृषी महाविद्यालयामुळे या भागातील कृषी संशोधन व विस्तारालादेखील चालना मिळण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर कृषी महाविद्यालयाची घोषणा २०१८ या वर्षातील नागपुरी पावसाळी अधिवेशनात केली होती. अधिवेशनकाळात विदर्भ, मराठवाड्यासाठी घोषित करण्यात आलेल्या विशेष पॅकेजमध्येसुद्धा याचा उल्लेख होता. त्यानंतर मंगळवारी (ता.२९) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर शिक्‍कामोर्तब करण्यात आले.  कृषी विद्यापीठाकरिता समिती परभणी कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. के. वेंकटेश्‍वरलू यांच्या अध्यक्षतेत समितीचे गठण करण्यात आले होते. खुद्द अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आग्रही असल्याने समितीने कृषी विद्यापीठ स्थापनेकरिता अनुकूल अहवाल दिला. जागाही निश्‍चित झाली. त्यानंतर आधीच्याच विद्यापीठांकडून शेतकऱ्यांना अपेक्षित फायदा झाला नसल्याचा विचार शासनस्तरावर मांडला गेला आणि स्वतंत्र कृषी विद्यापीठाचा प्रस्ताव मागे पडला. कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्‌घाटन  राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या ६ फेब्रुवारीला आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडचिरोली येथे स्थापन झालेल्या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते होणार असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. देशाच्या राष्ट्रपतींचा हा पहिलाच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा ठरण्याची शक्‍यता आहे. येत्या ६ फेब्रुवारीला राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते गडचिरोलीतील या कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोलीचे पालकमंत्री अम्बरिशराजे आत्राम, महसूल व कृषिमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT