कृषी व अन्नप्रक्रियेसाठी  स्वतंत्र संचालनालय स्थापन For agriculture and food processing Establishment of independent directorate 
मुख्य बातम्या

कृषी व अन्नप्रक्रियेसाठी  स्वतंत्र संचालनालय स्थापन

राज्य अन्न प्रक्रिया धोरणानुसार कृषी आयुक्तालयात आता स्वतंत्रपणे ‘कृषी व अन्नप्रक्रिया संचालनालय’ स्थापन करण्यात आले आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे : राज्य अन्न प्रक्रिया धोरणानुसार कृषी आयुक्तालयात आता स्वतंत्रपणे ‘कृषी व अन्नप्रक्रिया संचालनालय’ स्थापन करण्यात आले आहे. कृषी विभागाचे उपसचिव हे. गो. म्हापणकर यांनी संचालनालय स्थापनेबाबत शासन निर्णय जारी करताना एक कृती गट देखील स्थापन करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. कृषी व संलग्न उत्पादनांची प्रक्रियेद्वारे मूल्यसाखळी तयार करून ‘महाराष्ट्र ब्रॅंड’ विकसित करण्यासाठी कृतिगट काम करणार आहे.  या संचालनालयास संनियंत्रण व देखरेख नियामक मंडळ स्थापन होणार आहे. त्याचे अध्यक्षपद कृषिमंत्र्यांकडे देण्यात आले आहे. अन्न प्रक्रिया प्रकल्पांना मंजुरी देणे व मूल्यमापनासाठी राज्यस्तरावर एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्षपद मात्र कृषी आयुक्तांना देण्यात आले आहे. स्मार्ट, पोकरा, गटशेती, एसएफएससी, जैविक शेती अभियान, फलोत्पादन अभियान, आरकेव्हीवाय, मॅग्नेट, किसान संपदा, ऑपरेशन ग्रीन, अशा सर्व योजना आता संचालनालयाच्या अखत्यारित राबविल्या जाणार आहेत. संचालनालय नेमके काय करणार

  •   केंद्र व राज्य शासनाच्या योजना कृषी व अन्न प्रक्रिया योजनांची अंमलबजावणी 
  •   उद्योगांसाठी एक खिडकी व्यवस्था
  •   विकेल ते पिकेल अभियानासाठी योजनांची सांगड घालणे
  •   उत्पादनांचा महाराष्ट्र ब्रॅण्ड विकसित करणे 
  • संचालनालयामुळे काय बदल होणार 

  •   कृषी आयुक्तालयातील कृषी प्रक्रिया व नियोजन विभागाचा संचालक पूर्णवेळ संचालनालय सांभाळणार 
  •   संचालक कक्ष व कृषी प्रक्रिया शाखा आता संचालनालयाच्या अखत्यारित राहील
  •   नियोजन शाखा, संनियंत्रण व मूल्यमापन शाखा काम करतील
  •   राज्यस्तरीय सामुहिक फळप्रक्रिया व प्रक्रिया प्रशिक्षण केंद्र अखत्यारित येणार 
  •   कृषी निर्यात कक्षदेखील संचालनालयाशी संलग्न असेल 
  •   प्रत्येक जिल्ह्यातील एसएओ कार्यालयात संचालनालयासाठी स्वतंत्र तंत्र अधिकारी
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

    Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

    Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

    Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

    Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

    SCROLL FOR NEXT