Agricultural transport licenses to farmers in Paparabani are 'paperless'
Agricultural transport licenses to farmers in Paparabani are 'paperless' 
मुख्य बातम्या

परभणीत शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूक परवाने ‘पेपरलेस’

टीम अॅग्रोवन

परभणी ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॅाकडाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतूकीसाठी परवाने देण्याची प्रक्रिया ‘पेपरलेस’ करण्यात आली आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयास ई-मेलव्दारे किंवा कृषी विभागास व्हॅाट्सअॅपव्दारे माहिती सादर केल्यास शेतकऱ्यांना वाहतूक परवाना देण्याची प्रक्रिया केली जात आहे.

गावातील जनसुविधा केंद्र किंवा ग्रामपंचायतील संग्राम कक्षातून ई-मेलव्दारे परवान्यासाठी अर्ज करता येतील. आजवर जिल्ह्यातील सहा शेतकऱ्यांना वाहतूक परवाने देण्यात आले आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी सांगितले.

यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केलेली आहे. संत्रा, मोसंबी, लिंबू, अंजीर आदी फळपिकांचा हंगाम चांगला आहे. अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला तसेच फळे काढणीस तयार आहेत. वेळेवर काढणी करुन विक्री केली नाही तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. 

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अत्यावश्यक बाब म्हणून आरटीओ कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना शेतमालच्या वाहतुकीसाठी परवाने दिले जात आहेत. त्यासाठी आरटीओ कार्यालयात (प्रादेशिक परिवहन अधिकारी) न जाता कार्यालयाच्या ई-मेल आयडीवर वाहतूक परवान्यासाठी अर्ज करावयाचा आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे व्हाॅटसअपवर माहिती पाठविल्यानंतर ती आरटीओ कार्यालयाकडे पाठविली जाईल. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यास वाहतूक परवाना दिला जाईल.

वाहतूक परवान्यासाठी शेतकऱ्याचे नाव, गाव, वाहतूक करायचा शेतमाल, वाहन क्रमांक, वाहकाचे (ड्रायव्हर) नाव आदी माहिती mh२२@mahatranscom.in या ई-मेल आयडीवर पाठविणे आवश्यक आहे. त्यानंतर ई-मेल आयडीवरुनच वाहतूक परवाना दिला जाईल. वाहतूक परवान्याची छापिल प्रत (प्रिंट) काढू वाहनावर लावावी. तसेच एक प्रत जवळ ठेवावी. 

असा करा अर्ज ई -मेल करण्यासाठी आपल्या गावातील ई सुविधा केंद्र अथवा संग्राम कक्षाची मदत घ्यावी. ई-मेल आयडीवर वाहतूक परवाना प्राप्त होणे तसेच त्याची प्रिंट घेणे शक्य नसेल तर व्हॉट्सअॅप क्रमांक मेल आयडीमध्ये नमूद करणे आवश्यक आहे. वाहतूक परवाना संबंधित शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. आजवर दोन पीकअप व्हॅन आणि चार ट्रक असे सहा वाहतूक परवाने दिले आहेत. रुढी, केकरजवळा, मांडाखळी, मजलापूर आदी गावांतील शेतकऱ्यांना वाहतूक परवाने देण्यात आल्यामुळे संत्रा तसेच टरबूज बाजारपेठेत नेऊन विक्री करता येत आहे, असे श्री. आळसे यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT