Agricultural pump in Ruikhed area Farmers facing difficulties due to power outages 
मुख्य बातम्या

रुईखेड परिसरात कृषी पंप वीज तोडणीमुळे शेतकरी अडचणी

रुईखेड, जि.अकोलापरिसरात रब्बी पिके शेतात हिरवीगार असून सध्या पाण्याची नितांत गरज असताना महावितरणकडून कृषी पंपाची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम उघडण्यात आली आहे

टीम अॅग्रोवन

रुईखेड, जि.अकोला ः या परिसरात रब्बी पिके शेतात हिरवीगार असून सध्या पाण्याची नितांत गरज असताना महावितरणकडून कृषी पंपाची वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम उघडण्यात आली आहे. शेतकऱ्यांना गरज असतानाच महावितरणकडून होत असलेल्या अडवणुकीकडे शेतकरी अडचणीत आले आहेत. याकडे लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केले आहे.  सध्या गहू, हरभरा, भुईमूग, कांदा, केळी, संत्रा, टरबूज या पिकांना अत्यंत पाण्याची गरज आहे. या काळात महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्यात येत आहे. पिकांना पाणी देणे गरजेचे असून शेतकरी रात्रं-दिवस परिश्रम करून पीक जगविण्यासाठी धडपडत आहे. अशातच महावितरणकडून वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आल्याने शेतकरी अडचणी आला आहे. कमी पाणी मिळत असल्याने गव्हाच्या उत्पादनात होऊ शकते. महावितरणकडून होत असलेल्या सक्तीच्या वसुलीने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे. गेल्या काळात अकोटमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करून वीज तोडणीला तीव्र विरोध केला होता. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर महावितरणने वीज जोडणी खंडित करण्याची मोहीम थांबविली होती. वीज बिल दुरुस्त करण्यात यावे, तोपर्यंत सक्तीची वसुली थांबविण्यात यावी, असे निवेदन देण्यात आले होते. 

एकीकडे देयक दुरुस्तीचे शिबिर, दुसरीकडे वीज कपात  महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागणीबाबत कोणताही सहानुभूतिपूर्वक विचार झालेला नाही, असा आरोप शेतकरी करू लागले आहेत. एकीकडे वीज देयक दुरुस्तीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असताना देयके दुरुस्तीपूर्वीच शेतकऱ्यांकडून सक्तीने वसुली करण्यासाठी कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे. 

महावितरणकडून कृषी पंपाच्या वीज जोडणी खंडित करण्याचे काम सुरू आहे. ते तातडीने थांबवावे व देयक दुरुस्त करून आम्हाला नवीन देयक देण्यात यावे. आम्ही देयक भरणा करण्यास तयार आहोत.  -आशिष सुरेश झापे, केळी उत्पादक शेतकरी, रुईखेड   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Degradation Issue: खत पिशवीवर तांत्रिक माहिती नसल्याने माती ऱ्हासाचा धोका

Kidney Sale Case: पंजाबचा हिमांशू किडनी विक्री प्रकरणात होता कार्यवाहक

Farm Equipment: खेड तालुक्यात ‘महाडीबीटी’तून ट्रॅक्टर, शेती अवजारांचे वाटप

National Onion Bhavan: राष्ट्रीय कांदा भवन उभारणीसाठी शेतकऱ्यांकडून पाठिंबा

Illegal Moneylending: राहू बेट परिसराला अवैध सावकारीचा विळखा

SCROLL FOR NEXT