कृषीचे विद्यार्थी देणार शास्त्रोक्‍त फवारणीचे धडे
कृषीचे विद्यार्थी देणार शास्त्रोक्‍त फवारणीचे धडे 
मुख्य बातम्या

'कृषी'चे विद्यार्थी देणार शास्त्रोक्‍त फवारणीचे धडे

Vinod Ingole

नागपूर : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक विषबाधेमुळे झालेले मृत्यू आणि त्यानंतरच्या घडामोडींची दखल घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कृषी सेवा केंद्र संचालकांकरिता विशेष प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांमार्फत गावोगावी जागृतीचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशक फवारणी करताना २२ जणांचा मृत्यू झाला, तर ५६० पेक्षा अधिक बाधित झाले. त्यानंतर कृषी विभागाने गावोगावी शास्त्रोक्‍त पद्धतीने फवारणी संदर्भाने जागृतीसाठी पुढाकार घेतला. त्यानंतर आता कृषी विद्यापीठदेखील विदर्भातील ११ जिल्ह्यात अशाचप्रकारचा उपक्रम राबविणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत २६ कृषी महाविद्यालय आहेत. यातील विद्यार्थ्यांना आधी प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांमार्फत तालुकानिहाय गावागावांत पोचत फवारणीदरम्यान घ्यावयाच्या काळजीविषयक मार्गदर्शन करण्यावर भर दिला जाणार आहे. 

यवतमाळ जिल्ह्यापासून या उपक्रमाची सुरवात होईल. दिवाळीनंतर लगेच विद्यार्थी गावात जातील. यवतमाळ जिल्ह्यात मारोतराव वादाफळे, तसेच भाऊसाहेब माने कृषी महाविद्यालय अशी दोन महाविद्यालये आहेत. या दोन्ही व्यवस्थापनांशी कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी संवाद साधला. त्यानंतर महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने देखील आपली सामाजिक जबाबदारी जाणत या उपक्रमात आपले योगदान देण्याचे जाहिर केले. विद्यार्थी सध्या दिवाळीच्या सुटीवर असल्याने ते परतल्यानंतर लवकरच या उपक्रमाची अंमलबजावणी होईल. 

कृषी सेवा केंद्र संचालकांना धडे कोणत्या कीटकनाशकामध्ये किती जहाल कीडनाशक आहे. त्यातील घटक, शरीराशी त्याचा संपर्क आल्यास होणारा प्रादुर्भाव, कीडनाशक मिश्रण शक्‍य आहे किंवा नाही, अशा अनेक बाबींची माहिती कृषी सेवा केंद्र संचालकांना असावी, याकरिता देखील कृषी विद्यापीठ प्रयत्न करणार आहे. त्याकरिता कृषी सेवा केंद्र संचालकांना त्या त्या जिल्ह्यात किंवा तालुक्‍यात प्रशिक्षण दिले जाईल. कृषी विज्ञान केंद्रामार्फत हा उपक्रम राबविला जाणार आहे.

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत कीटकनाशक फवारणी विषयक जागृतीकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता देखील अशाप्रकारचे प्रशिक्षण घेण्यावर भर दिला जाणार आहे. त्याची जबाबदारी केव्हीकेवर राहील. - डॉ. विलास भाले, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT