chiku  
मुख्य बातम्या

चिकू विमा हप्त्याचा फेरविचार नाहीच 

चिकू फळपीक विमा योजनेत चालू वर्षी शेतकऱ्यांच्या हिश्शात सहा पटीने केलेल्या वाढीचा फेरविचार करण्यास कृषिमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला.

टीम अॅग्रोवन

बोर्डी, जि. पालघरः चिकू फळपीक विमा योजनेत चालू वर्षी शेतकऱ्यांच्या हिश्शात सहा पटीने केलेल्या वाढीचा फेरविचार करण्यास कृषिमंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला. तसेच शेतकऱ्यांनी विमा योजनेत भाग घ्यायचा किंवा नाही हे त्यांच्या इच्छेवर राहील. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येणार नाही, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघाच्या शिष्टमंडळाला दिली. 

डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार विनोद निकोले, राज्य उत्पादक संघाचे अध्यक्ष विनायक बारी, खजिनदार यज्ञेश सावे, अजय पाटील व अभिजित राऊत यांनी बुधवार (ता.२३) मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पंतप्रधान हंगामी फळ पीक विमा योजनेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्यात सहा पटीने केलेली वाढ कमी करावी, अथवा त्याचा फेरविचार करावा, या मागणीसाठी भेट घेतली. मात्र कृषी मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत विमा कंपनीची बाजू घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे मोठ्या आशेने गेलेल्या शिष्टमंडळाला रिकाम्या हाताने परतावे लागले. 

वीस वर्षांपासून चिकू बागायतदार वेगवेगळ्या समस्यांमध्ये अडकला आहे. उत्पादन घटले आहे. बाजारपेठांमध्ये मालाची विक्री योग्य दराने होत नाही, तसेच खताचे भाव वाढल्यामुळे बागायतदारांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT