कृषी अवजारे
कृषी अवजारे  
मुख्य बातम्या

अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती द्याः कृषी आयुक्तांचे आदेश

टीम अॅग्रोवन

पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यात काही अधिकारी कामचुकारपणा करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती देण्याचे आदेश कृषी आयुक्तांनी जारी केले आहेत.   केंद्र व राज्याच्या विविध योजनांसाठी २०१९-२० च्या चालू आर्थिक वर्षासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. योजना आहेत, निधी आहेत, हजारो कर्मचाऱ्यांची यंत्रणा आहे. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत निधी पोचत नसल्याचे चित्र काही भागांमध्ये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी कृषी विभागातील सर्व योजनांचा अलीकडेच आढावा घेतला असता अधिकाऱ्यांचा गाफिलपणा निदर्शनास आला. विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज आलेले असताना क्षेत्रिय स्तरावर पूर्वसंमतीच दिली जात नसल्याचे आढळले आहे. “पूर्वसंमतीचे काम संथ गतीने सुरू ठेवल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना अकारण लाभापासून अजून काही महिने वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले. विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकाऱ्यांना याच आठवड्यात कृषी आयुक्तालयाकडे अहवाल पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यभर कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे.  “सर्व योजनांचा भौतिक व आर्थिक लक्षांक तपासून १०० टक्के पूर्व संमती द्यावी व तसे अहवाल आयुक्तालयाला पाठवावेत,” अशा सूचना देण्यात आल्या आहेत.  शेतकरीहितासाठी सुटी रद्द  शेतकऱ्यांचे अर्ज दाखल होऊनदेखील क्षेत्रीय पातळीवर अर्ज पडून राहणे व पूर्वसंमतीसाठी थेट आयुक्तालयाला पाठपुरावा करावा लागणे, ही लाजिरवाणी बाब असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची गेल्या आठ सप्टेंबरला रविवारची सुटीदेखील रद्द करण्यात आली. सात ते नऊ सप्टेंबरच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व अर्जांना पूर्वसंमती देणे, असे एकमेव काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले होते. आचारसंहितेमुळे आढावा घेण्याचे आदेश पूर्वसंमतीचे काम संथ गतीने सुरू ठेवल्यामुळे आचारसंहिता लागू झाल्यानंतर शेतकऱ्यांना अकारण लाभापासून अजून काही महिने वंचित रहावे लागू शकते. त्यामुळे सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. आयुक्तालयाकडून दखल

  • विविध योजनांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध  
  • काही भागांत शेतकऱ्यांपर्यंत निधी पोचत नसल्याचे चित्र  
  • क्षेत्रीय स्तरावर पूर्वसंमतीचे काम संथ गतीने  
  • सर्व योजनांचा आढावा घेण्याचे आयुक्तालयाचे आदेश  
  • विभागीय कृषी सहसंचालक व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अधिकाऱ्यांना आठवडाभरात अहवाल पाठविण्याचे आदेश  
  • सात ते नऊ सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या सर्व अर्जांना पूर्वसंमती देण्याचे काम कर्मचाऱ्यांना देण्यात आले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

    Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

    Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

    Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

    Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

    SCROLL FOR NEXT