पाणीप्रश्नी सोनईसह अठरा गावांतील ग्रामस्थांचे आंदोलन
पाणीप्रश्नी सोनईसह अठरा गावांतील ग्रामस्थांचे आंदोलन 
मुख्य बातम्या

पाणीप्रश्नी सोनईसह अठरा गावांतील ग्रामस्थांचे आंदोलन

टीम अॅग्रोवन

सोनई, ता. नेवासा  : सोनईसह अठरा गावांतील पिण्याच्या पाण्याची योजना सुरू व्हावी, यासाठी शनिवारी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी-शनिशिंगणापूर रस्त्यावर दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी हजारो महिला हंडे घेऊन उपस्थित होत्या.

सोनई, तामसवाडीसह वाड्यावस्त्यांचा या योजनेत समावेश आहे. ८५ कोटी रुपये खर्चाची ही योजना एक सव्वा वर्षांपासून सुरू झाली. मात्र ही योजना सलग महिनाभर कधीच सुरू राहिली नाही. योजना हस्तांतर व कामगारांच्या वेतनावरून योजनेला साडेसातीचा फेरा लागला आहे. आठ दिवसापासून पाणी बंद झाल्याने शनिवारी सकाळी दहा वाजता राहुरी रस्त्यावरील बेल्हेकरवाडी फाटा येथे अठरा गावांतील ग्रामस्थ ठाण मांडून बसले. महिला हंडा, बादल्या, ड्रम घेऊन रस्त्यावर बसल्या.

या वेळी मुकुंद भोगे, जयवंत लिपाने, खलील इनामदार, संजय जंगले, डॉ.रामनाथ बडे, शरद आरगडे, शरद जाधव यांची भाषणे झाली. माजी आमदार गडाख यांनी या योजनेसाठी केलेले प्रयत्न सांगून आमदार मुरकुटे यांच्या निष्क्रियतेमुळेच ही योजना बंद पडली असा जाहीर आरोप केला. शनिवार असल्याने या आंदोलनामुळे शनिभक्तांची मोठ्या प्रमाणात अडचण झाली. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT