किनगाव येथे हंडा मोर्चा 
मुख्य बातम्या

पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर महिलांचा हंडा मोर्चा

टॅंकर बंद झाल्याचे कार्यालयास कळविले असून, टॅंकरची मागणी केलेली आहे. कंत्राटदारांनी उद्या, परवा देतो असे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत टॅंकर सुरळीत सुरू झालेले नाही. आजच टॅंकर सुरू करण्यात येणार आहेत. - एस. डी. महाजन, ग्रामविकास अधिकारी, किनगाव.

टीम अॅग्रोवन

रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी भीषण पाणीटंचाई व त्यातच पाण्यासाठी सुरू असलेले टॅंकर बंद झाल्याने सोमवारी (ता. २०) ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला.  

अंबड तालुक्‍यातील किनगाव येथे मागील सहा ते सात दिवसांपासून टॅंकर बंद झाल्याने महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. डोंगराळ, मुरमाड, खडकाळ भाग असल्याने व अवर्षण प्रवण क्षेत्र असल्याने या भागात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. अंबड तालुक्‍यात सुरवातीलाच किनगावला टॅंकर सुरू करण्यात आले होते. 

डिसेंबर महिन्यापासूून गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. मे महिन्यात सर्वांत जास्त पाणीटंचाई जाणवत असताना टॅंकर बंद झाल्याने महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  येत्या दोन दिवसांत टॅंकर सुरू न केल्यास अंबड तहसील कार्यालय व पंचायत समितीवर मोर्चा काढणार असल्याचे महिलांनी सांगितले. संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढून टॅंकर सुरू होईपर्यंत ग्रामपंचायतीतच बसून राहण्याचा पवित्रा घेतला. या वेळी सरपंच सुलोचनाबाई वाघ, ग्रामविकास अधिकारी यांनी तत्काळ टॅंकर सुरू करण्याचे आश्वासन दिले.

ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया

गावाच्या परिसरात पाणी नसल्याने दोन ते तीन किलोमीटरवरून डोक्‍यावर पाणी आणावे लागत आहे. - चंद्रकला रावसाहेब वाघ, किनगाव

टॅंकर बंद झाल्याने उन्हातान्हात दुरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे चांगलाच त्रास होत आहे.  - कविता चौधरी, ग्रामस्थ, किनगाव. ---

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT