धरणे आंदोलन
धरणे आंदोलन  
मुख्य बातम्या

शेतमाल नियमनमुक्तीसाठी ठिकठिकाणी शेतकरी संघटनेचे धरणे

टीम अॅग्रोवन

नगर : शेतकऱ्यांना आपला शेतीमाल कोठेही विकण्याची परवानगी असावी, मार्केट सेस रद्द करावा व शहरांमध्ये शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी जागा निश्चित करून द्याव्यात, या मागण्यांसाठी सोमवारी (ता. २५) शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. येथे अध्यक्ष अनिल घनवट यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.  सर्व शेतीमाल नियमनमुक्त केल्यास व्यापारी शेतकऱ्याच्या घरी किंवा बांधावर सौदे करतील. शेतकऱ्याला करावे लागणारे वाहतूक, हमाली, बारदाना असे अनेक खर्च वाचतील. खासगी बाजार समित्या तयार झाल्यामुळे स्पर्धेतून शेतकऱ्यांना अधिक सुविधा व ज्यादा दर मिळण्याची शक्यता आहे. बाजार समित्यांमध्ये झालेल्या व्यापाराच्या किमतीचा एक टक्का मार्केट सेस व्यापाऱ्यांना भरावा लगतो. हा सेस शेवटी शेतकऱ्याच्या मालातूनच वसूल केला जातो. सेस चुकविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो. शेतमाल विक्रीसाठी अधिकृत जागा नसल्यामुळे शहरात शेतकऱ्यांची मोठी कुचंबना होते. काही नागरीक, स्थानिक गुंड, पालिका कर्मचारी, पोलिस शेतकऱ्यांना माल विकू देत नाहीत. हाउसिंग सोसायटीत, पार्क, खुल्या जागेत शेतकऱ्यांना ठरावीक जागा निश्चित करून द्या, शासनाने तातडीने अध्यादेश काढून त्याची अंमलबजावणी न केल्यास संघटना तीव्र आंदोलन करेल, असे या वेळी सांगण्यात आले.  या वेळी संघटनेचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बापूसाहेब आढाव, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय तोरडमल, स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, युवा अघाडी अध्यक्ष महादेव खामकर, रमेश रेपाळे, डॉ. संजय कुलकर्णी, कारभारी कणसे, सिराज शेख, अनिल भुजबळ,  रमेश गिरमे, नानासाहेब जाधव, अंबादस राऊत, अवसरे महाराज, बाळासाहेब सातव, बंसी इंगळे, संजय करपे, अंबादस चव्हाण, जनू काका जगताप, संपत सातव, शंकर ननवरे, बिभिषन लगड अादी  उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT