कोल्हापूर येथे मोर्चा
कोल्हापूर येथे मोर्चा 
मुख्य बातम्या

पशुखाद्य दरवाढ : शिवसेनेचा ‘गोकुळ’च्या कार्यालयावर मोर्चा

टीम अॅग्रोवन

कोल्हापूर  : पशुखाद्याची दरवाढ रद्द करावी या मागणीसाठी मंगळवारी (ता. ३०) शिवसेनेच्या वतीने कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर जनावरांसह मोर्चा काढण्यात आला. संचालकांची पोटं भरण्यासाठीच ही दरवाढ केल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या वेळी केला.

दरम्यान, शिष्टमंडळाने विचारलेल्या प्रश्नांना उद्धटपणे उत्तर देणारे संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांना पवार व विजय देवणे यांनी चांगलेच धारेवर धरले. पशुखाद्याची दरवाढ रद्द करावी, दुधाचे थकीत अनुदान शेतकऱ्यांना द्यावे या मागणीसाठी २ मेपासून विविध भागांत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा या शिष्टमंडळाने श्री. घाणेकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

या आंदोलनाची सुरवात २ मे रोजी शिवाजी पूल येथे होईल, अशी घोषणा या वेळी करण्यात आली. आंदोलनात माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील, अवधूत साळुंखे, दत्ता टिपुगडे, राजू राऊतआदी सहभागी झाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

Govind Hande : अविरत कर्मयोगी

Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

SCROLL FOR NEXT