संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

इंदापूर बाजार समितीत शेतीमाल तारण योजना सुरू

टीम अॅग्रोवन

इंदापूर, जि. पुणे  ः महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, तसेच इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाजार समितीच्या वतीने शेतीमाल तारण कर्ज योजनेचा प्रारंभ इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आला.

या वेळी बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, संचालक मधुकर भरणे, दत्तात्रेय फडतरे, संतोष वाबळे, अनिल बागल, शिवाजी इजगुडे, दत्तात्रेय सपकळ, निर्मला रणमोडे, स्वाती सपकाळ, गणेशकुमार झगडे, संग्रामसिंह निंबाळकर, आबा देवकाते, रोहित मोहोळकर, सचिन देवकर, सुभाष दिवसे, मेघ:श्याम पाटील, महावीर गांधी, भानुदास सपकळ, नानासाहेब शेंडे, सचिन भाग्यवंत उपस्थित होते.

अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, की शेतीमालाच्या काढणी हंगामात बाजारभाव उतरल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास अपेक्षित भाव मिळत नाही. तसेच या कालावधीत शेतकऱ्यांना पैशांची गरज पडते. त्यामुळे त्यांची आर्थिक गरज पूर्ण करण्यासाठी, तसेच त्यांना पुढील कालावधीत वाढीव बाजारभावाचा फायदा व्हावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.

योजनेत तूर, सोयाबीन, मूग, उडीद, हरभरा, ज्वारी, बाजरी, मका, सुर्यफुल, गहू, करडई या पिकांचा समावेश असून, तारण ठेवलेल्या शेतीमालाच्या एकूण किमतीच्या ७५ टक्क्यांपर्यंत तारणकर्ज बाजार समितीमार्फत उपलब्ध करून देण्यात येईल. या कर्जाचा मुदत व्याजदर ६ टक्के असून, तो १८० दिवसांसाठी आहे. या वेळी सूत्रसंचालन सचिव जीवन फडतरे यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT