Action will be taken against those who stockpile fertilizers: Agriculture Department
Action will be taken against those who stockpile fertilizers: Agriculture Department 
मुख्य बातम्या

खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई करणार ः कृषी विभाग

टीम अॅग्रोवन

नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे. कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. तरीही खतांची साठेमारी करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या खते व बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करण्याचा इशारा पथकांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी दिली.

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बांधावर खते योजना राबवण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांशी संपर्क साधून शेतकऱ्यांनी बांधावर खते मिळण्यासाठी आग्रह करावा. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ हजारांवर टन खते शेतकऱ्यांच्या बांधावर पोचवण्यात आली आहेत. खतांची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी खते व बियाणे विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना यापूर्वी सूचनाही देण्यात आलेल्या आहेत.

तसेच तालुकास्तरीय कृषी विभागाच्या पथकाकडून सर्व खते दुकानांची तपासणी, गोडाउनची तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय आपण स्वत:ही या दुकान, गोडाउनला आकस्मिक भेट देऊन त्याची तपासणी करीत आहोत. आजवर जिथे त्रुटी आढळून आली अशा ७ ते ८ विक्रेत्यांना विक्री बंदचे आदेशही देण्यात आल्याचे शेंडे यांनी सांगितले.

जिल्ह्यात ५१ हजार २६० टन युरियाची मागणी आहे. त्यापैकी २४ हजार ८६० टन युरिया आलेला आहे. युरियाची टंचाई नाही. सर्व तालुक्यांत कृषी विभागाची पथके नेमण्यात आलेली आहेत. त्यांच्याकडून खते, बियाणे विक्रेत्यांच्या दुकानांची, गोडाउनची तपासणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतात वारेमाप युरियाचा वापर करू नये, असेही शेंडे यांनी सांगितले.

खतांची मागणी, विक्री व उपलब्धता (टनमध्ये)
खताचे नाव मागणी उपलब्ध विक्री शिल्लक
सिंगल सुपर फॉस्पेट २९७०० १०८०० २१३१८ १०९८५
युरिया ५१२६० २४८६० १३६१३ ११२४७
डीएपी २१२९० १२०७९ ६६११ ५४६८
एमओपी ९२०० २७४९ ८४१ १९०८
एनपीके ३९९१० ३०२३३ ११६५० १८५८३
कंपोस्ट ४०९ ४०९    
एकूण १५१३६० ९१६४८ ४३०४८ ४८६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT