ration 
मुख्य बातम्या

सातारा जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई 

जिल्ह्यात एकूण १६७९ स्वस्त धान्य दुकाने असून विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करुन ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले.

टीम अॅग्रोवन

सातारा: कोरोना जिल्ह्यात एकूण १६७९ स्वस्त धान्य दुकाने असून विविध स्वरुपाच्या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा कार्यालयाने जिल्ह्यातील २६ स्वस्त धान्य दुकांनावर कारवाई करुन ११ दुकानदारांचे परवाने रद्द केले. तीन दुकानांची संपूर्ण अनामत रक्कम जप्त केली आहे. सहा दुकानदारांकडून धान्याच्या गैरव्यवहाराची बाजारभावाने भरपाई वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर उर्वरित काही दुकानदारांना गैरप्रकारांबाबत नोटीस देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे. 

यामध्ये लाभार्थी यांना विहीत परिणामापेक्षा कमी धान्य देणे, जादा दर आकारणे. काही दुकानदारांनी ग्राहक यादीमध्ये नाव असतानाही धान्य देण्यास नकार दिला आहे. अंत्योदय व प्राधान्य कार्डवरील ऑनलाइन नोंद असणाऱ्या व्यक्ती संख्येपेक्षा कमी सदस्यांचे धान्य वितरण केल्याची प्रकरणेही पुढे आलेली आहेत. तसेच विक्री साठा लेखे प्रत्यक्ष विक्री केलेल्या धान्याशी न जुळणे, दर्शनी भागात भावफलक व प्राप्त धान्य माहिती न लावणे, उध्दट वर्तणूक करणे, ग्राहक रजिस्टर अद्यावत न ठेवणे, लाभार्थ्यांना पावत्या न देणे इत्यादी बाबत पुरवठा विभागाकडील भरारी पथकामार्फत तपासणीच्यावेळी गैरप्रकार निर्दशनास आले आहेत. संवेदनशीलपणे व जबाबदारीने काम न करणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदार यांच्यावर यापुढेही कार्यवाही सुरुच राहणार आहे, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी किसवे-देवकाते यांनी सांगितले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT