Accelerate the work of building Currant in Nashik
Accelerate the work of building Currant in Nashik 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात बेदाणा निर्मितीच्या कामाला वेग

टीम अॅग्रोवन

नाशिक : ऐन द्राक्ष हंगामाच्या अंतिम टप्प्यात लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील क्षेत्रापैकी ३० टक्के द्राक्षबागांमधील काढण्या बाकी आहेत. यात प्रामुख्याने निर्यातक्षम मालासाठी उठाव नसल्याने त्यास अपेक्षित दरही नाही. त्यामुळे माल खराब होत असल्याने बेदाणा निर्मितीच्या कामांना वेग आला आहे. 

द्राक्ष काढणीसाठी निर्यातदार व व्यापाऱ्यांशी व्यवहार करून ठेवले होते. मात्र, ‘कोरोना’मुळे प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या. निर्यात प्रक्रिया काही काळ बंद झाली तर शीतगृहे ही बंद होती. पॅक हाऊसमध्येही मजुरांनाही एकत्रित काम करण्यास बंदी लादली गेली. यामुळे द्राक्ष हंगाम अडचणीतून जायला सुरुवात झाल्याने काढणी मंदावली. त्याचा परिणाम असा की, तयार माल अतिपक्व होऊन वेलींवरच राहिला आहे. त्यामुळे पुढील हंगामाचे नियोजन करण्यासाठी माल काढून खरड छाटणीच्या तयारीसाठी शेतकरी बेदाणा उत्पादन घेत आहेत. 

निफाड, चांदवड, दिंडोरी, नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये नैसर्गिक पद्धतीने वाळवून किंवा रसायने वापरून बेदाणे बनविताना पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला द्राक्ष उत्पादकांना अवकाळीच्या फटक्याला सामोरे जावे लागले. तर आता अधिक उत्पादन खर्च करूनही ५ ते १५ रुपयांपर्यंत प्रतिकिलोप्रमाणे दर मिळतो आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणे अवघड झाले आहे. 

आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असताना व्यापारी, मजूरटंचाई असल्याने द्राक्ष उत्पादकांना बेदाणा निर्मितीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. देशभरात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी असल्याने पुरवठा व विक्री अडचणीत सापडली आहे.

यावर्षी झालेला एकरी खर्च तीन लाख रुपये खर्च करून छाटणी ते माल तयार होईपर्यंत एक प्लॉट फेल गेला. त्यामुळे मोठी मेहनत करून व्यापारी येत नसल्याने नुकसान सोसून बेदाणा करण्याचा निर्णय घेतला.  - शांताराम अडसरे, द्राक्ष उत्पादक, करंजी खुर्द, ता. निफाड 

नैसर्गिक अडचणीत सुद्धा उत्पादन खर्च करून निर्यातक्षम माल तयार केला. त्यात व्यापारी येत नाही, निर्यातदारांकडून उठाव नसल्याने दर नाही. त्यामुळे एवढ्या मालाचे करायचे काय? यावर पर्याय म्हणून द्राक्षापासून बेदाणे करत आहोत. - बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT