कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन, संवर्धनाचा जागर Aagya bee conservation in Kolhapur, awareness of conservation
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन, संवर्धनाचा जागर Aagya bee conservation in Kolhapur, awareness of conservation 
मुख्य बातम्या

कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन, संवर्धनाचा जागर 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पुढाकार घेतला घेतला आहे. प्रत्येक तालुक्यात कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग यांच्या वतीने आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनावर सध्या काम सुरू आहे. जिल्हाधिकारी देसाई यांच्या पुढाकारातून आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनाचे काम जिल्ह्यात व्यापक स्तरावर सुरू आहे. शास्त्रीय पद्धतीने संकलित होणारा शुद्ध मध जिल्ह्यातील ग्राहकांना लवकरच उपलब्ध करण्याविषयी प्रयत्न सुरू आहेत. 

पारंपरिक पद्धतीला फाटा  अजूनही आग्या मधमाशा पारंपरिक पद्धतीने काढल्या जात आहेत. मधाच्या हव्यासाने मधमाशांची पोळी जाळून, मोडून आणि काहीवेळा तर चक्क कीटकनाशके मारून मध काढला जातो. ही पारंपरिक पद्धत पूर्ण चुकीची असून, यामुळे मोठ्या प्रमाणात मधमाशा नष्ट होऊन शेतीला, जैव विविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. एकाही आग्या मधमाशीला न मारता शास्त्रीय पद्धतीने त्या पोळ्यातील मध अहिंसक पद्धतीने काढता येतो व पुन्हा मधमाशा त्याच पोळ्यामध्ये आपल्याला मध संकलित करून देतात. मधमाशा जगल्या तरच शुद्ध मध, मेण व इतर उपपदार्थ आपल्याला नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार आहेत. 

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होणार  जिल्ह्यात प्रकल्प संचालक आत्मा कोल्हापूर सुनंदा कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन कदम, गिरोली, (ता. पन्हाळा) व ज्ञानदेव पाटील, खडूळे,( ता. गगनबावडा) हे तज्ज्ञ प्रशिक्षक आणि मध उद्योजक कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये प्रशिक्षण व प्रात्यक्षिक देण्याचे काम करीत आहेत. आग्या मधमाशी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविणेसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कृषी विभाग, आत्मा यांचेकडून प्रथमच आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनाचा हा उपक्रम पथदर्शी ठरणार आहे. यातून रोजगार निर्मिती, मधमाशा संवर्धन, मध उत्पादन, संकलन, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रॅंडिंग, शेतकरी ते ग्राहक थेट विक्री, परपरागीभवन या गोष्टींना चालना मिळणार आहे. 

प्रतिक्रिया

आग्या मधमाशांबद्दलची भीती घालवून शास्त्रोक्त पद्धतीने मधमाशांना कसलीही हानी न पोहोचू देता मध गोळा करण्याचे प्रशिक्षण पहिल्यांदाच मिळाले.  -मोहन पडवळ, शेतकरी, मार्गेवाडी, ता. गगनबावडा, जि. कोल्हापूर 

जिल्हाधिकारी देसाई यांच्या पुढाकारातून आग्या मधमाशा जतन आणि संवर्धन विषय गांभीर्याने घेतला आहे. त्यांच्या कल्पनेतून आणि सूचनेनुसार यावर येत्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात विशेष काम होणार आहे आणि त्या दृष्टीने सध्या आम्ही प्रयत्न करीत आहोत. 

-मोहन कदम, तज्ज्ञ मार्गदर्शक व मध उत्पादक, गिरोली, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT