बोंडअळी
बोंडअळी  
मुख्य बातम्या

अमरावतीत बोंड अळीचा ८९ टक्‍के कपाशीला फटका

टीम अॅग्रोवन

अमरावती ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्रापैकी ८९.८४ टक्‍के क्षेत्र प्रभावित झाले आहे. हे नुकसान ३३ टक्‍क्‍यांवर असल्याने त्यापोटी ‘एनडीआरएफ’कडून १८२ कोटी २६ लाख रुपयांची मदत मिळावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी सरकारला सादर केला आहे.  या वर्षीच्या हंगामात दोन लाख २२ हजार ४१५ शेतकऱ्यांनी २ लाख २२ हजार ५८६ हेक्‍टरवर कपाशीची लागवड केली. मात्र ऑक्‍टोबर महिन्यात आलेल्या गुलाबी बोंड अळीच्या संकटाने ८९.८४ टक्‍के म्हणजेच १ लाख ९९ हजार १७२ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकाचे ३३ टक्‍क्‍यांवर नुकसान झाले. यामध्ये जिरायती कपाशीचे १ लाख ३० हजार हेक्‍टर, तर बागायती कपाशीचे ६८ हजार ३४३ हेक्‍टर क्षेत्राचा समावेश आहे. त्यानुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी ६८०० रुपयांप्रमाणे ८९ कोटी ६१ लाख ११ हजार, तर बागायती क्षेत्रासाठी हेक्‍टरी १३ हजार ५०० रुपये याप्रमाणे ९२ कोटी ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुसार सरकारच्या माध्यमातून एनडीआरएफकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. गुलाबी बोंड अळीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सात डिसेंबरला जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिले होते. त्यानुसार सर्व्हेक्षण पूर्ण करून संयुक्‍त स्वाक्षरी अहवाल प्रशासनाला सादर  करण्यात आला. 

तालुकानिहाय नुकसानभरपाई (कोटींत) भातकुली ः ५.५०, अमरावती ः ७.५५, चांदूर रेल्वे ः ६.१८, नांदगाव खंडेश्‍वर ः ७.८६, मोर्शी ः १९.२२, वरुड ः २७.९४, चांदूर बाजार ः १५.३४, तिवसा ः १२.६३, अचलपूर ः १८.७१, अंजनगावसूर्जी ः १४.९१, दर्यापूर ः १६.९७, धारणी ः ६.७७, चिखलदरा ः १ कोटी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT