सांगोला तालुक्यात आठ छावणीचालक संस्थांसह ८४ जणांवर गुन्हे 
मुख्य बातम्या

सांगोला तालुक्यात आठ छावणीचालक संस्थांसह ८४ जणांवर गुन्हे

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सांगोला तालुक्‍यात सुरू करण्यात आलेल्या चारा छावणीच्या चालक संस्थांनी छावण्या मिळविण्यासाठी खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी आठ संस्थांसह अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक अशा ८४ जणांविरुद्ध सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सांगोल्याच्या तहसीलदारांनी २४ जून रोजी मंडलाधिकारी रवींद्र ननवरे यांना छावणी मिळण्यासंदर्भात खोटे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित संस्थांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार ननवरे यांनी यासंबंधीची फिर्याद पोलिसात दिली.

तालुक्‍यात १४३ चारा छावण्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजुरी दिली आहे. या मंजुरीत शासनाने दिलेल्या शर्तीमधील अट क्र. ९ अन्वये यापूर्वीच्या कालावधीत राज्यात ज्या चारा छावणी प्रायोजक संस्थांवर छावणीमधील अनियमिततेसंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल असतील, न्यायालयाकडून संबंधित संस्थांची निर्दोष मुक्तता झालेली नसेल, अशा संस्थांना शासकीय अनुदानातून चारा छावणी देऊ नये, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

२०१२-१३, १३-१४ मध्ये चारा छावण्यांमध्ये संस्थेवर, संचालक, सचिव, अध्यक्षांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे ज्या संस्था चारा छावणी चालवण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार आहेत, त्या संस्था व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला नसल्याबाबतचे प्रमाणप्रत्र २०१९ मध्ये चारा छावणी मागणी प्रस्तावामध्ये दाखल करून घेण्यात आले होते. या अटी व शर्तीच्या अनुषंगाने सर्व सामाजिक संस्था, दूध संस्थांनी फेब्रुवारी व मार्चमध्ये तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर केले. पण या संस्थांची धर्मादाय आयुक्त सोलापूर, सहायक निबंधक सहकारी संस्था, सांगोला व सहायक निबंधक दुग्ध सहकारी संस्था, सोलापूर यांच्यामार्फत तपासणी केली. त्यावेळी काही संस्थांमधील संचालक, सचिव हे पूर्वीच्या छावणीत गुन्हे दाखल झालेल्या संस्थेमध्ये आढळून आले. त्यामुळे नियम पायदळी तुडवताना शासनाची फसवणूक केल्याने संबंधित संस्था व पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. 

गुन्हे दाखल झालेल्या संस्था 

  • श्री दीपकआबा साळुंखे-पाटील वाचनालय (हंगिरगे)
  • सिद्धनाथ मोटर वाहतूक सहकारी संस्था (सांगोला) 
  • विकासरत्न बहुउद्देशीय कला-क्रीडा व सांस्कृतिक मंडळ (आलेगाव)
  • राजमाता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था (आलेगाव)
  •  श्री शंभो महादेव ट्रस्ट (लोणविरे)
  • सिद्धनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी (बागलवाडी)
  • श्री मजूर सहकारी संस्था नवलेनगर (एखतपूर)
  • राजे शिवछत्रपती बहुउद्देशीय संस्था (चिणके)
  • या आठ संस्थांच्या वाढेगाव, आलेगाव, बागलवाडी, चिणके, एखतपूर, वाकी-घेरडी (ता. सांगोला), मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील छावण्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तसेच त्यांच्या अध्यक्ष, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, संचालिका, संचालक व सदस्य अशा एकूण ८४ जणांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध खोटी प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

    Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

    Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

    ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

    Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी

    SCROLL FOR NEXT