तिवरे धरण
तिवरे धरण 
मुख्य बातम्या

राज्यात पाच दिवसांत ७४ बळी

टीम अॅग्रोवन

पुणे : दुष्काळाने होरपळणाऱ्या महाराष्ट्राला पावसाने दिलासा दिला आहे. मात्र, यंदाचा पावसाळा सोबत संकटही घेऊन आला आहे. मंगळवारी (ता. २) रात्री रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून २४ जण वाहून गेल्याची घटना घडली. तर, गेल्या पाच दिवसांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण ७४ जणांचा मृत्यू झाला.

पुण्यात २१ जण दगावले पुणे : कोंढव्यात बांधकामाच्या ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या पत्र्याच्या शेडवर शुक्रवारी मध्यरात्री शेजारील इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमधील सर्व जण बिहारमधील बांधकाम मजूर व त्यांचे कुटुंबीय असून, चार लहान मुलांचाही त्यात समावेश आहे. सोमवारी (ता. १) आंबेगाव येथील घटनेत सीमाभिंत मजुरांच्या झोपड्यांवर पडून सहा जण दगावले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.   मालाडला भिंत कोसळून २२ जणांचा मृत्यू मुंबई : मालाडमधील पिंपरीपाडा परिसरातील झोपड्यांवर भिंत कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. यातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. तर जवळपास ७५ जण जखमी झाले आहे. या सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातच कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची सीमाभिंत कोसळून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. पाण्याची टाकी कोसळून चार ठार नाशिक : सातपूर परिसरातील कार्बन नाका भागातील ध्रुवनगर येथे नव्याने सुरू असलेल्या सम्राट ग्रुपच्या ‘अपना घर’ बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी मजुरांसाठी बांधण्यात आलेली पाण्याची टाकी फुटली. मजुरांच्या अंगावर टाकीचा मलबा पडून झालेल्या दुर्घटनेमध्ये तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमीपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.  वऱ्हाडात वीज पडून आठ जणांचा मृत्यू अकोला : वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या तिन्ही जिल्ह्यांत मागील १५ दिवसांत तब्बल आठ जणांचा वीज पडल्याने मृत्यू झाला. तर वीजपडीच्या विविध घटनांमध्ये १२ पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT