अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानापोटी ६२ कोटी 
मुख्य बातम्या

अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अनुदानापोटी ६२ कोटी

टीम अॅग्रोवन

अमरावती ः तूर आणि हरभरा अनुदान योजनेचा जिल्ह्यातील ४५ हजार १२४ पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. ६२ कोटी ६१ लाख रुपयांचे अनुदान या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

हमीभावाने तूर आणि हरभरा खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आल होती. परंतु ऑनलाईन नोंदणी करण्यात आल्यानंतरही काही शेतकऱ्यांची तूर आणि हरभरा खरेदी करणे सरकारला शक्‍य झाले नाही. अशा शेतकऱ्यांना प्रतिक्‍विंटल अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे अनुदानाची रक्‍कम जमा झाली नाही. अशा शेतकऱ्यांना तालुका खरेदी केंद्रावरून अनुदान वितरीत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. 

याकरिता शेतकऱ्यांनी त्यांचे आधारलिंक बॅंक खाते आणि आधारकार्डची सत्यप्रत खरेदी केंद्रावर जमा करावयाची आहे. अमरावती जिल्ह्यात ४८ हजार ७३६ पात्र लाभार्थी आहेत. यापैकी तुरीच्या अनुदानाचे ३० हजार ५२९ लाभार्थ्यांपैकी २२८ हजार ४५६ शेतकऱ्यांना ३९ कोटी २७ लाख रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले. तांत्रिक अडचणीमुळे २ हजार ०७३ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २ कोटी ८६ लाख रुपयांचे अनुदान जमा झालेले नाही, तसेच हरभऱ्याच्या अनुदानाचे जिल्ह्यात १८ हजार २०८ पात्र लाभार्थी शेतकरी आहेत. त्यापैकी १६ हजार ६६८ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात २३ कोटी ३४ लाख रुपयांची रक्‍कम जमा करण्यात आली आहे. 

तांत्रिक अडचणींमुळ १ हजार ५४० शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात तुरीची २ कोटी १३ लाख रुपयांची रक्‍कम जमा होऊ शकली नाही, असे जिल्हा मार्केटिंगच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT