देशभरात ‘सीसीआय’कडून ५८ लाख गाठी कापूस खरेदी
देशभरात ‘सीसीआय’कडून ५८ लाख गाठी कापूस खरेदी 
मुख्य बातम्या

देशभरात ‘सीसीआय’कडून ५८ लाख गाठी कापूस खरेदी

कोजेन्सिस वृत्तसेवा

मुंबई: २०१९-२० च्या हंगामात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) १ ऑक्टोबर २०१९ पासून कापूस खरेदीस प्रारंभ केला आहे. आतापर्यंत ‘सीसीआय’ने ५८ लाख गाठी कापूस खरेदी केल्याची माहिती ‘सीसीआय’च्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक पी. अली राणी यांनी दिली.  एकूण कापूस खेरदीपैकी तेलंगणात सर्वाधिक आवक झाली आहे. तेलंगणात तब्बल ३१ लाख गाठी, म्हणजेच ५३ टक्के कापूस खरेदी झाली आहे. उर्वरित खरेदी इतर कापूस उत्पादक राज्यांमध्ये झाली . गुजरात, महाराष्ट्र आणि तेलंगणा ही राज्ये कापूस उत्पादनात आघाडीवरील आहेत. ‘‘चालू २०१९-२० च्या हंगामात देशात देशात ३६० लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. आतापर्यंत बाजारात अंदाजापैकी जवळपास ५५ टक्के कापूस आवक झाली आहे. यापैकी ‘सीसीआय’ने २८ टक्के कापूस खेरदी केला. चालू हंगामात ६५ ते ७० लाख कापूस गाठी खरेदीचे ‘सीसीआय’चे उद्दिष्ट आहे; परंतु कापूस खरेदी ही खुल्या बाजारातील दर आणि कापसाचा दर्जा कसा आहे यावर अवलंबून आहे,’’ असे पी. अली राणी म्हणाल्या.

‘सीसीआय’ने गेल्या वर्षी देशात ११ लाख गाठी कापूस खरेदी केली होती. यातुलनेत यंदा कापूस खरेदीचे ठेवलेले उद्दिष्ट सहा पट अधिक आहे. 

२०१९-२० च्या हंगामासाठी केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसासाठी ५ हजार ५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे; तर मध्यम धाग्याच्या कापसासाठी प्रतिक्विंटल ५ हजार २५५ रुपये हमीभाव जाहीर केला. मात्र, सध्या बाजारात कमी दर्जाच्या कापसाची खरेदी हमीभावापेक्षा १०० ते १५० रुपये कमी दराने होत आहे.   आवकेत घसरण देशभरातील हजर बाजारातील कापूस आवक हळूहळू कमी होत आहे. सध्या बाजारात दैनंदिन दोन लाख २० हजार गाठींची आवक होत आहे. जानेवारीच्या मध्यात दैनंदिन बाजारातील कापूस आवक दोन लाख ६० हजार गाठींवर होती. तिसऱ्या आणि चौथ्या वेचणीत कापसाचा दर्जा कमी येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ‘सीसीआय’ची कापूस खरेदी धिम्या गतीने सुरू राहण्याची शक्यता आहे.  कापूस बाजारातील स्थिती उत्पादनाचा अंदाज :  ३६० लाख गाठी  कापूस आवक :  ५५ टक्के  ‘सीसीआय’ची खरेदी :  २८ टक्के  खरेदीचे उद्दिष्ट :  ७० लाख गाठी तेलंगणात खरेदी :  ३१ लाख गाठी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT