56 lakh rupees crop loan distribute in Hingoli till Thursday
56 lakh rupees crop loan distribute in Hingoli till Thursday  
मुख्य बातम्या

हिंगोलीत गुरूवारपर्यंत ५६ लाख रुपयांचे वाटप पीक कर्जवाटप

टीम अॅग्रोवन

हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरिप हंगामातील पीक कर्जवाटपास सुरुवात झाली आहे. गुरुवार (ता.३०) पर्यंत ७३ शेतकऱ्यांना ५६ लाख ९१ हजार रुपयांचे वाटप करण्यात आले, अशी माहिती संबंधीत सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यातील बॅंकाना यंदा १ हजार ४४३ कोटी ७३ लाख रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात खरिप हंगामामध्ये १ हजार १६८ कोटी ९५ लाख रुपये आणि रब्बी हंगामातील २७४ कोटी ७८ लाख रुपयांच्या उद्दिष्टाचा समावेश आहे. यंदा जिल्हा बॅंकेला एकूण १८५ कोटी ९३ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. त्यात खरिपातील १४८ कोटी ८९ लाख रुपये आणि रब्बीतील ३७ कोटी ४ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. 

व्यापारी बॅंकांना खरिपात ८५९ कोटी १० लाख रुपये आणि रब्बीत १९७ कोटी ७० लाख रुपये असे एकूण १ हजार ५६ कोटी ८० लाख रुपये उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला खरिपात १६० कोटी ९६ लाख रुपये, तर रब्बीत ४० कोटी ४ लाख रुपयांचे उद्दिष्ट आहे. गुरुवार (ता.३०) पर्यंत जिल्हा बॅंकेने २६ शेतकऱ्यांना ७ लाख ९१ हजार रुपये, तर व्यापारी बॅंकांनी ४७ शेतकऱ्यांना ४९ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT