लाेकसहभागातून ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे
लाेकसहभागातून ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे 
मुख्य बातम्या

लाेकसहभागातून ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे

टीम अॅग्रोवन

पुणे  : लाेकसहभागातून राज्यात ३२० निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठीच्या पहिल्या टप्प्यातील १०६ जागांवर कामे सुरू करण्यात आली असून, पुढील पाच वर्षांसाठी १२० काेटींचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती पर्यटन विकास महामंडळाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी दिली.   या वेळी मंडळाचे सदस्य किशाेर किशाेर मिस्त्रीकाेटकर, अनुज खरे, जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे उपस्थित हाेते. लिमये म्हणाले, ‘‘सध्याच्या प्रसिद्ध निसर्ग पर्यटन केंद्रांवर माेठ्याप्रमाणावर गर्दी हाेत आहे. यामुळे स्थानिक परिस्थितीवर विपरीत परिणाम हाेत आहेत. याचा विचार करून राज्यात नवीन निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यासाठी राज्य शासनाने २०१५ मध्ये स्वतंत्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. या मंडळाद्वारे वन विभागाच्या जमिनींवर निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करण्यात येत आहेत. ही केंद्रे विकसित करत असताना, स्थानिक परिस्थितीला काेणताही धाेका निर्माण हाेणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. तर स्थानिकांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्त्राेत या केंद्रांद्वारे उपलब्ध हाेणार आहे. स्थानिक वन संरक्षण समित्यांद्वारे ही केंद्र संचलित असणार आहे.’’ ‘‘राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये ३२० केंद्रांसाठीच्या जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. यामधील पहिल्या १०६ केंद्राचा पुढील पाच वर्षांचा विकास आराखडा बनिवण्यात आला असून, यासाठी १२० काेटींची तरतूद करण्यात आली आहे. तर निसर्गाचा अनुभव शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी यंदा निसर्गानुभव संकल्पेतून जानेवारी २०१९ मध्ये एकाच दिवशी ८० हजार विद्यार्थ्यांना निसर्गाची सहल घडविणार आहाेत. निसर्ग पर्यटन केंद्रे विकसित करत असताना पुरातत्त्व विभागाशी समन्वय साधत गड, किल्ल्यांचादेखील विकास करणार आहे’’, असेही लिमये यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT