soybean 
मुख्य बातम्या

खरिपात सोयाबीन बियाण्यात ३२ हजार टनांची तुट 

देशात खरिपासाठी सोयाबीन वगळता बियाण्यांचा पर्याप्त साठा आहे. खरिपात २ लाख ७२ हजार ३२२.२ टन सोयाबीन बियाण्याची गरज आहे.

कोजेन्सिस वृत्तसेवा

नवी दिल्ली: देशात खरिपासाठी सोयाबीन वगळता बियाण्यांचा पर्याप्त साठा आहे. खरिपात २ लाख ७२ हजार ३२२.२ टन सोयाबीन बियाण्याची गरज आहे. मात्र, यंदा केवळ २ लाख ४० हजार २९८.३ टन सोयाबीन बियाणे उपलब्ध असून खरिपात ३२ हजार टन बियाण्याची तुट आहे, अशी माहिती सरकारच्या सुत्रांनी दिली.  ‘‘देशात खरीप हंगामासाठी सोयाबीन वगळता इतर पिकांच्या बियाण्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही. बियाण्याची गुणवत्ता कमी प्रतीची असल्यास त्याचा परिणाम उत्पादकतेवर होतो. अनेक शेतकऱ्यांकडे बियाणे उपलब्ध असते. शेतकरी तयार करत असलेल्या या बियाण्याची गुणवत्ता चांगली नसली तरी ते त्याचाच वापर करतात,’’ असे सुत्रांनी सांगितले.  केंद्रीय कृषीमंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशातील शेतकऱ्यांनी २०१९-२०च्या हंगामात ११.३ देशलक्ष हेक्टरवर सोयाबीनची पेरणी केली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही पेरणी १ टक्क्यांनी जास्त होती.  देशात बहुतांश बियाणे उत्पादन हे सीड हबमध्ये होते. देशात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या आणि राज्याच्या कृषी विद्यापीठांमध्ये असलेल्या ३५ सीड हबमध्ये तेलबिया बियाणे उत्पादन होते. या सीड हबमध्ये उच्च उत्पादकता असणाऱ्या, दुष्काळ आणि किड प्रतिकारक्षम तेलबिया वाणांची निर्मिती करण्यात आली आहे.  देशात कडधान्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन्ही हंगामात लागवड केली जाते. ‘‘खरिपासाठी तूर, उडीद, मुग, वाटाणा आदी कडधान्य बियाणांची अतिरिक्त उपलब्धता आहे. खरिपासाठी तूर बियाण्याची २७ हजार १९७.३ टनांची आवश्‍यकता असताना २७ हजार ८२५.२ टन बियाण्याची उपब्धता आहे. मुग बियाण्याची १८ हजार ८६३.२ टनांची गरज असून २४ हजार ०१७.७ टन बियाणे उपब्ध आहे,’’ अशी माहिती सुत्रांनी दिली.  खरिपात केंद्रीय कृषी मंत्रालयाने १०.१ दशलक्ष टन कडधान्य उत्पादनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. २०१९-२० च्या खरिपात देशात ७.९ दशलक्ष टन उत्पादन झाले होते. तसेच सरकारकडे भाताच्या बियाण्ची अतिरिक्त उपलब्धता आहे. खरिपात ७ लाख ५९ हजार ५८७.८ टनांची आवश्‍यकता असते. तर, सरकारकडे ७ लाख ९८ हजार ३१३.४ टन बियाणे उपलब्ध आहे.  देशात खरिपासाठी आवश्‍यक आणि उपलब्ध बियाणे (टनांत) 

पीक आवश्‍यकता उपलब्धता 
सोयाबीन २,७२,३२२.२ २,४०,२९८.३ 
तूर २७,१९७.३ २७,८२५.२ 
मूग १८,८६३.२ २४,०१७.७ 
भात ७,५९,५८७.८ ७,९८,३१३.४ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT