संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

तब्बल २५१ ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित होणार

Chandrakant Jadhav

जळगाव : जिल्हाभरातील जवळपास २५१ ग्रापपंचायतींनी वीजबिल न भरल्याने त्यांचा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्‍यता आहे. महावितरण किंवा वीज कंपनीने बिले थकलेल्या ग्रामपंचायतींचा वीजपुरवठा खंडित करण्यास सुरवात केली आहे.  या ग्रामपंचायतींकडे मिळून तीन कोटींपर्यंत थकबाकी आहे. ही थकबाकी पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी किंवा कूपनलिकांच्या वीजजोडणीची आहे. ही थकबाकी भरण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच व महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांची बैठक जिल्हा परिषदेत मार्च महिन्यात झाली होती.

त्यात थकीत वीजबिल ही एकरकमी भरले, तर सवलत दिली जाईल. तसेच थकीत रक्कम हप्त्याच्या स्वरूपातही भरता येईल. १० हजार रुपये हप्ता प्रतिमहिना रक्कम भरायची, असा निर्णय झाला होता. परंतु संबंधित ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरलीच नाही. नंतर या ग्रामपंचायतींना पुन्हा एकदा महावितरण कंपनीने नोटिसा बजावल्या होत्या. परंतु त्याची दखल या ग्रामपंचायतींनी घेतली नाही.

आता थेट वीजपुुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने हाती घेतली आहे. चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, जळगाव या तालुक्‍यांमधील ७५ ग्रामपंचायतींचा पिण्याचे पाणी पुरविणाऱ्या कूपनलिका, विहिरी यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून थकीत विजबिले भरायची की नाहीत या संदर्भात ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक यांच्यात संभ्रम आहे. त्यामुळे वीजबिले भरण्यास विलंब होत असल्याची माहिती मिळाली आहे. 

ग्रामपंचायतींचे उत्पन्न गावातील पीक स्थिती कशी आहे यावरच अवलंबून असते. पिके चांगली तर कर गोळा होतो. पण गेली काही वर्षे खरीप हाती येतो तर रब्बीत फटका बसतो. त्यामुळे कर गोळा होत नाही. कुठलीही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक वीजबिल थकविणारी नसते.  - वासुदेव पाटील, माजी सरपंच, जवखेडे, ता. एरंडोल, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT