225 crore fund for debt relief in Sangli
225 crore fund for debt relief in Sangli 
मुख्य बातम्या

सांगलीत कर्जमुक्तीसाठी २२५ कोटींचा निधी

टीम अॅग्रोवन

सांगली : ‘‘जिल्ह्यात महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे काम गतीने सुरू आहे. ७६ हजार २७ खातेदारांपैकी ६३ हजार ९३४ खात्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले. जिल्ह्याला २२५ कोटी ६३ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. योजनेचे काम दोन दिवसांत पूर्ण होईल,’’ अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. ५) महसूलच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी कर्जमुक्तीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पुणे विभागीय उपायुक्त साधना सावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे उपस्थित होत्या. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७६ हजार २७ खात्यांच्या यादीचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडील ५६ हजार ९१९; तर राष्ट्रीयीकृत बॅंकांकडील ७ हजार १५ अशा ६३ हजार ९३४ खात्यांचे प्रमाणीकरण झाले. १२ हजार ९३ खात्यांचे प्रमाणीकरण बाकी आहे. जे बाहेरगावी आहेत, त्यांना ज्या ठिकाणी असतील तेथे प्रमाणीकरणासाठी सुविधा पुरविण्यात आली आहे.’’ 

‘‘जिल्ह्याला ३८ हजार १०१ खात्यांवरील कर्जाच्या रकमेपोटी २२५ कोटी ६३ लाखांची रक्कम उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत प्राप्त १ हजार ३०४ पैकी ७२१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. उर्वरित तक्रारींचे त्वरित निवारण करावे,’’ असे आदेश डॉ. म्हैसेकर यांनी दिले. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले... 

  • कामकाजात गतिमानता आणा 
  • अवैध गौण खनिज उत्खननाबाबत कारवाई करा 
  • पूरबाधित पडझडीचा आढावा घ्या 
  • ई-हक्क प्रणाली वेगाने राबवा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Govind Hande : शहाणे करून सोडले, सकळ जण...

    Govind Hande : अविरत कर्मयोगी

    Wheat Market : विदर्भात गव्हाच्या दरात चढ-उतार

    Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

    Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

    SCROLL FOR NEXT