राहुरीत आजपासून जाॅइंट ॲग्रोस्को, २०८ शिफारशी होणार सादर
राहुरीत आजपासून जाॅइंट ॲग्रोस्को, २०८ शिफारशी होणार सादर 
मुख्य बातम्या

राहुरीत आजपासून जाॅइंट ॲग्रोस्को, २०८ शिफारशी होणार सादर

टीम अॅग्रोवन

नागपूर  ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या संशोधन कार्याचा धाडोंळा घेणारी संयुक्‍त कृषी संशोधन व विकास समितीची (जॉइंट ॲग्रोस्को) ४७ वी बैठक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणार आहे. बुधवारी (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या परिषदेचे उद्‍घाटन होणार असून तब्बल २०८ संशोधन शिफारशींचे सादरीकरण यात होईल. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांत कृषी संशोधन सातत्याने होत राहते. त्यातील शेती व शेतकऱ्यांसाठी पूरक असलेल्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण करून नंतर त्याला संयुक्‍त कृषी संशोधन व विकास समितीच्या बैठकीत प्रसारणासाठी मान्यता दिली जाते. बुधवारपासून (ता. २९) राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभागृहात जॉइंट ॲग्रोस्को होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲग्रोस्कोचे उद्‍घाटन करतील. या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंधारणमंत्री राम शिंदे, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांच्यासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित राहणार आहेत.  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १९७३ पासून आजपर्यंत एकूण ५७४२ शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये परभणी कृषी विद्यापीठाच्या १०६४, दापोलीच्या १३०६, राहुरी १७७३ तर अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या १५९९ याप्रमाणे प्रसारीत शिफारशीत आहेत. चारही कृषी विद्यापीठांत ७९ संशोधन केंद्र आहेत. राहुरीअंतर्गत २७, अकोलाअंतर्गत १९, परभणी १७ आणि दापोली १६ अशी त्यांची संख्या आहे. चारही कृषी विद्यापीठांत यातील ७९ संशोधन केंद्रामार्फत ६८१ नवीन वाण, १४४ कृषी अवजारे प्रसारीत करण्यात आले. सुधारीत तंत्रज्ञानाच्या पीकनिहाय ४९०१ शिफारशी देण्यात आल्या आहेत.  राहुरी विद्यापीठाच्या ७१ शिफारशी या वर्षीच्या ॲग्रोस्कोमध्ये चारही विद्यापीठांच्या २०८ शिफारशी आहेत. त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्वाधिक ७१, अकोला व परभणी कृषी विद्यापीठाच्या प्रत्येकी ४७ तर दापोली कृषी विद्यापीठाच्या ४३ शिफारशींचा समावेश आहे. १३ वाण, १७८ तंत्रज्ञान, १७ कृषी अवजारे प्रसारणासाठी राहतील, असेही एमसीईएआरच्या सूत्रांनी सांगीतले.  मुख्यमंत्र्यांचा दौरा अनिश्‍चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्‍घाटक असले तरी त्यांच्या दौऱ्याबाबत अनिश्‍चितता असल्याचे देखील जबाबदार सूत्रांकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT