मराठवाड्यातील १५ ते २० टक्‍के क्षेत्र नापेर
मराठवाड्यातील १५ ते २० टक्‍के क्षेत्र नापेर 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील २० टक्‍के क्षेत्र थेट नापेर

टीम अॅग्रोवन

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत खरिपाच्या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत अजूनही जवळपास १५ ते २० टक्‍के क्षेत्र नापेर असल्याची स्थिती आहे. लांबलेला, असमान पावसाच्या कृपेमुळे ही स्थिती  निर्माण झाली असून, दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या क्षेत्राची यामध्ये भर पडण्याची शक्‍यता आहे. जुलैअखेरच्या स्थितीनुसार सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत ९३.१९ टक्‍के, तर लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणीमध्ये ७७.३७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. 

औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण २० लाख ८३ हजार ८८५ हेक्‍टर क्षेत्र होते. त्या तुलनेत सोमवार (ता. २९)अखेरपर्यंत १९ लाख ४२ हजार ५० हेक्‍टरवर पेरणी उरकली. औरंगाबाद जिल्ह्यातील ६ लाख ४८ हजार ६४६ हेक्‍टर, जालना ५ लाख ५४ हजार ४५७ हेक्‍टर, तर बीड जिल्ह्यातील ७ लाख ३८ हजार ९४७ हेक्‍टर क्षेत्राचा त्यात समावेश आहे. 

लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांत खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र २९ लाख १२ हजार २९८ हेक्‍टर आहे. त्या तुलनेत पावसाची अवकृपा राहिलेल्या या पाचही जिल्ह्यांत २२ लाख ५३ हजार ३०८ हेक्‍टरवर अर्थात ७७.३७ टक्‍के क्षेत्रावर पेरणी झाली. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातील ४ लाख १४२ हेक्‍टर, उस्मानाबाद ३ लाख ४ हजार ५६३ हेक्‍टर, नांदेड ७ लाख २५ हजार ८५३ हेक्‍टर, परभणी ४ लाख ५५ हजार ८८० हेक्‍टर, तर हिंगोली जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ८७० हेक्‍टरचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT