संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना

पुणे : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे.

टीम अॅग्रोवन

पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे ‘कमवा आणि शिका’ योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमध्ये तीन वर्षांसाठी प्रशासकीय कामांचा अनुभव मिळणार आहे. तीन वर्षे काम केल्यानंतर त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची पदवीदेखील मिळणार असल्याची माहिती समाजकल्याण सभापती सारिका पानसरे यांनी दिली. 

पानसरे म्हणाल्या, की कमवा शिका योजनेतून अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्त जाती- जमातींच्या १८ ते २२ वयोगटातील १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तीन वर्षे प्रशासनासोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.

तसेच पहिल्या वर्षी ८ हजार रुपये, दुसऱ्या वर्षी ९ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षी १० हजार रुपये मासिक वेतन मिळेल. विद्यार्थ्यांना तीन वर्षे काम आणि स्वयंअध्ययन करून इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची बॅचलर्स इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (सर्व्हिस मॅनेजेमेंट) म्हणजेच ‘बीबीए’ ही पदवी प्राप्त होणार असून, जिल्हा परिषदेकडून तीन वर्षे काम केल्याचे प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार असल्याचे पानसरे यांनी कळविले आहे.   

ऑनलाइन नोंदणी आवश्यक  योजनेत सहभागासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना IGNOU.MKCL.ORG या संकेतस्थळावर नोंदणी करून मंगळवारपर्यंत (ता. ७ जुलै) स्व-माहिती भरायची आहे. त्यांनतर शुक्रवारपर्यंत (ता. १०) बीबीए (एसएम) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरायचा आहे. तसेच पुणे जिल्हा परिषदेच्या punezp.mkcl.org या संकेतस्थळावरही मंगळवारपर्यंत (ता.७) अर्ज करायचा आहे.

दरम्यान १२ जुलै २०२० ला सकाळी ८ ते सायंकाळी ७ दरम्यान प्रवेश परीक्षा होणार असून, या परीक्षेतील निवडक गुणवंत विद्यार्थ्यांची योजनेमध्ये निवड केली जाईल, अधिक महितीसाठी पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.    

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT