Farmers Distress : वर्धा जिल्ह्यात पावसाचा खंड आणि वाढत्या उन्हामुळे कपाशी पिकाची वाढ खुंटली आहे. अनेक शेतांमध्ये कापसाला सरासरी चारच बोंडे लागली आहेत. झाडांवर हिरवा पाला दिसत असला, तरी अपेक्षित उत्पादनाची आशा मावळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत..सप्टेंबरपर्यंत किरकोळ पावसाच्या भरवशावर तग धरलेल्या कापूस पिकाला ऑक्टोबरमधील पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसला. उष्णतेमुळे फुलांची गळ झाली असून, बोंडधारणाही अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. काही शेतांमध्ये एकरी एक क्विंटल कापूस मिळेल की नाही, अशी परिस्थिती आहे..Australia Agri Model: ऑस्ट्रेलियातील सहकारी संस्थांचे कृषी मॉडेल.मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीवर झालेला खर्चही भरून निघण्याची शाश्वती नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कापूस पिकाचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी विशेष दुष्काळी अनुदान आणि पीकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उल्लास कोटमकर यांनी केली आहे..Agri Pump Cable Theft: कृषिपंपांच्या केबल चोरीने शेतकरी त्रस्त.पीकविमा भरपाईची प्रक्रिया पूर्ण करून रक्कम खात्यात जमा करावी, चालू हंगामातील पीककर्ज वसुली स्थगित करून कर्जाचे पुनर्गठन करावे आणि पुढील हंगामासाठी बियाणे व निविष्ठांवर विशेष मदत द्यावी, अशी मागणी खापरी येथील शेतकरी रंगनाथ तालवटकर यांनी केली. तर पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी अपेक्षा खुर्सापार येथील शेतकरी वसंता महाजन यांनी व्यक्त केली..हिरव्या पालावर पंचनामे करू नये‘‘पिकावर हिरवा पाला दिसत असला, तरी त्यावरून नुकसान ठरवू नये. प्रत्यक्ष पीकस्थिती आणि अपेक्षित उत्पादन लक्षात घेऊन पंचनामे करावेत. शेतकऱ्यांचा अंत न पाहता शासनाने मदत करावी,’’ अशी मागणी समुद्रपूर जैविक शेती मिशन शेतकरी कंपनीचे अध्यक्ष चक्रधर भगत यांनी केली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.