उष्ण तापमानाशी जुळवून घेण्यासाठी मधमाश्यांचा आकार ठरतो महत्त्वाचा 
मुख्य बातम्या

उष्ण तापमानाशी जुळवून घेण्यासाठी मधमाश्यांचा आकार ठरतो महत्त्वाचा !

वृत्तसेवा

उष्ण कटिबंधीय मधमाश्या या आकाराने मोठ्या असून, लहान माश्यांच्या तुलनेमध्ये उष्ण स्थितीमध्ये चांगल्या प्रकारे उडू शकतात. त्यांचा मोठा आकार हा शरीराचे वाढलेले तापमान सहन करण्यास मदत करत असावा, असे तज्ज्ञांचे अनुमान आहे. मात्र, हे तापमान आणि आकार नियमाच्या विपरीत आहे. कारण जे कीटक शरीराच्या तापमानाच्या नियंत्रणासाठी बाह्य पर्यावरणावर अवलंबून असतात, त्यांचे आकार थंड वातावरणामध्ये मोठे आणि उष्ण वातावरणामध्ये लहान असल्याचे हा नियम सांगतो.

अॅरिझोना राज्य विद्यापीठातील संशोधकांना मोठ्या आकाराच्या उष्ण कटिबंधीय मधमाश्या उष्ण वातावरणामध्ये लहान मधमाश्यांच्या तुलनेत चांगल्या प्रकारे उडू शकत असल्याचे आढळले. हे संशोधन न्यू ओरलिन्स येथे नुकत्याच पार पडलेल्या‘अमेरिकन फिजिऑलॉजिकल सोसायटी’च्या ‘कंपॅरेटिव्ह फिजिओलॉजी ः कॉम्प्लेक्सिटी अॅण्ड इंटिग्रेशन’ या विषयावरील परिसंवादामध्ये सादर करण्यात आले.

कीटकांचे तीन प्रकार पडतात - १) शरीराच्या तापमानासाठी बाह्य तापमानावर अवलंबून असणारे - इकोथर्म्स २) बाह्य तापमानावर अवलंबून, मात्र स्वतःच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकणारे - पोईकिलोथर्म्स किंवा थर्मोरेग्युलेटर्स (सूर्यप्रकाश आणि सावली शोधणारे किंवा त्याप्रमाणे वर्तन करणारे.) ३) शरीरशास्त्रीयदृष्ट्या स्वतःच्या तापमानामध्ये वाढ करू शकणारे - एन्डोथर्म्स. या अभ्यासात ज्या माश्यांचा समावेश होता, त्यांचे मूळ हे पनामातील वर्षावनातील अतिरिक्त उष्णतेच्या परिसरातील आहे. येथे त्यांच्या उडण्याच्या क्षमतेवर मर्यादा येतात. दिवसाचा उष्ण कालावधी वगळून अन्न मिळवण्यासाठी फारच कमी वेळ शिल्लक राहतो. परिणामी त्यांच्या वसाहतीसाठी पुरेसे अन्न गोळा करता येत नाही. त्याचा फटका वसाहती कमी होण्यामध्ये आणि परिसरातील पिकांच्या परागीभवनावरही होतो. उष्ण कालावधीमध्ये उडण्याची क्षमता असणे, हे मधमाश्यांसाठी अधिक फायदेशीर राहू शकते.

  • संशोधन विद्यार्थिनी मेघान ड्युएल आणि जॉन एफ. हॅरीसन यांनी दंश न करणाऱ्या मधमाश्यांचा १० प्रजातींच्या शरीराच्या तापमान मोजले. या माश्यांचे शरीर वस्तुमान २ ते १२० मिलिग्रॅम इतके होते. या माश्या उष्ण तापमानामध्ये कशा प्रकारे कार्य करतात, याचे विश्लेषण करण्यात आले. त्याच प्रमाणे या माश्यांना भेट दिलेल्या पाने आणि फुलांचे पृष्ठभागाचे व हवेचे तापमान (सावलीतील आणि उन्हातील) नोंदविले. संशोधनाविषयी माहिती देताना मेघान ड्यूएल यांनी सांगितले, की या प्रत्येक प्रकारामध्ये मधमाश्या आपला शिरकाव करून घेतात. बहुतांश कीटक वर्तनातून उष्णतेचे नियमन करतात. त्याच्या शरीराचे आकार वाढत जाते, तसे त्यांच्या या क्षमतेमध्ये वाढ दिसून येते. मोठ्या माश्या उदा. बंबल बी काही प्रमाणात इन्डोथर्म्सप्रमाणे वर्तन करतात. त्यांचे स्नायू एकमेकांशी होणाऱ्या घर्षणातून उष्णता तयार करतात. मात्र, शरीराचे सातत्यपूर्ण तापमान नियंत्रण शक्य होत नाही.
  • तापमान आणि आकार यांच्या नियमामुळे संशोधकांना उष्ण वातावरणामध्ये लहान आकाराच्या मधमाश्या अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतील, असे वाटत होते. मात्र, त्याच्या विरुद्ध बाब पुढे आली. मोठ्या आकाराच्या मधमाश्यांनी उष्ण तापमानाशी चांगल्या प्रकारे जुळवून घेतले. अगदी नेहमीच्या उष्ण तापमानापेक्षा अधिक (काही वेळा तर सुमारे १० अंश सेल्सिअस अधिक) हवेचे तापमान असतानाही त्यांनी जुळवून घेतले. उडतेवेळी त्यांच्या शरीरात निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे ही क्षमता त्यांच्यामध्ये आली असावी. हीच शरीरात निर्माण होणारी उष्णता थंड दिवसांमध्ये सकाळच्या काळातही लहान मधमाश्यांच्या तुलनेमध्ये कार्यक्षम ठेवण्यासाठी उपयोगी पडत असावी.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Local Body Elections: आज २९ लाख मतदार बजाविणार मतदानाचा हक्क

    India US Trade Deal: अमेरिकेतील शेतीमालाला मर्यादित प्रवेश?

    Maharashtra Weather: पहाटे गारठा तर दुपारी उकाडा

    Student Nutrition Program: आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या आहारात स्ट्रॉबेरी

    BJP Mayor Victory: आठ महापालिकांमध्ये भाजपचे महापौर

    SCROLL FOR NEXT