Ghodegaon News: आदिवासी आश्रम शाळेत शिकत असलेल्या मुलांना रोजच्या आहारात स्ट्रॉबेरी देण्यासाठी आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी विकत घेऊन ती आश्रम शाळेतील मुलांना दररोजच्या आहारात नियमितपणे देणार असल्याची माहिती प्रकल्पाधिकारी प्रदीप देसाई यांनी दिली. .आदिवासी विकास विभाग व कृषी विभाग यांनी अर्थसंकल्पीय योजनेतून आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी व साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले आहे. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन संपूर्ण सेंद्रिय स्ट्रॉबेरी पिकवली आहे..Strawberry Farming: घनवटवाडीत स्ट्रॉबेरीच्या पिकाची गोडी.प्रकल्प अधिकारी देसाई यांनी शेतकऱ्यांनी पिकवलेली ही स्ट्रॉबेरी १५५ रुपये किलोने खरेदी करून आश्रमशाळेतील मुलांच्या खायला देण्याची योजना सुरू केली आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांनी घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरू असलेल्या मध्यवर्ती स्वयंपाकगृहात शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी आणून द्यावी व या ठिकाणी वजन करून पैसे घेऊन जावेत, असे आवाहन प्रकल्पाधिकारी देसाई यांनी केले आहे..Strawberry Farming: स्ट्रॉबेरी उत्पादनासह थेट विक्री मॉडेल.पहिल्या दिवशी उगलेवाडी येथील आठ शेतकऱ्यांनी अंदाजे ५० किलो स्ट्रॉबेरी आणून दिली. या स्ट्रॉबेरी खरेदी प्रसंगी सहाय्यक प्रकल्प अधिकारी सोनल कोतवाल, संदेश पाटील, समाजसेविका जनाबाई उगले व ग्रामस्थ उपस्थित होते..आदिवासी शेतकऱ्यांनी पिकवलेली स्ट्रॉबेरी आदिवासी मुलांनाच खायला जात असल्याचा मनापासून आनंद होत आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढाकार घेऊन योजना सुरू करायला लावली याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पुढील वर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी झाले पाहिजे.प्रदीप देसाई, प्रकल्पाधिकारी, घोडेगाव (ता. आंबेगाव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.