Pune News: राज्याच्या तापमानात होत असलेले चढ-उतार, अंशतः ढगाळ आकाश यामुळे पहाटे गारठा तर दुपारी उकाडा अशी परस्पर विरोधी स्थिती पाहायला मिळत आहे. आज (ता. ७) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी-अधिक होत असून, शुक्रवारी (ता. ६) पूर्व राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ४.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी पारा ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे..शुक्रवारी (ता. ६) निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १०.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकणातील भिरा येथे राज्यातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात राज्यात पहाटे गारठा जाणवत असून, दिवसभर अंशतः ढगाळ हवामान असल्याने उकाडा कायम आहे. आज (ता. ७) राज्यात ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..Weather Update: कोकणात उन्हाचा चटका वाढला.शुक्रवारी (ता. ६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.३---१३.८अहिल्यानगर---३०.८---१३.३धुळे---३१.४---११.४जळगाव---३१.८---१५.१जेऊर---३१.०---१२.०कोल्हापूर---३०.५--१९.०.महाबळेश्वर---२४.४---१४.०मालेगाव---३०.६---१३.२नाशिक---३०.३---१३.५निफाड---२९.७---१०.८सांगली---३१.७---१८.१सातारा---३०.७---१५.०.सोलापूर---३२.६---१९.३सांताक्रूझ---३५.१---२०.४डहाणू---३२.३---१९.४रत्नागिरी---३३.६---१९.६छत्रपती संभाजीनगर---३०.०---१४.६धारशिव---३१.५---१४.४परभणी---३०.५---१५.७.Weather Update: कोकणात उन्हाचा चटका वाढला.परभणी (कृषी)---३०.०---११.५अकोला---३२.८---१७.४अमरावती---३१.०---१६.३भंडारा---३०.०---निरंकबुलडाणा---३१.७---१६.५ब्रह्मपुरी---३३.१---१६.३चंद्रपूर---३२.४---१७.०.गडचिरोली---३१.२---१५.६गोंदिया---३०.२---१४.२नागपूर---३०.९---१६.४वर्धा---३२.०---१६.६वाशीम---३१.८---१४.४यवतमाळ---३०.७---१५.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१०.८---३१.८पश्चिम महाराष्ट्र---१२.०---३२.६मराठवाडा---११.५---३१.५विदर्भ---१४.२---३३.१कोकण---१९.४---३७.०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.