जलवाहिन्या ठरू शकतात हानिकारक जिवाणूंचे स्रोत
जलवाहिन्या ठरू शकतात हानिकारक जिवाणूंचे स्रोत 
मुख्य बातम्या

जलवाहिन्या ठरू शकतात हानिकारक जिवाणूंचे स्रोत

वृत्तसेवा

ओलावा आणि अन्य अनुकूल वातावरणामुळे जलवाहिन्या किंवा कालव्यांमध्ये हानीकारक जिवाणूंची वाढ वेगाने होऊ शकते. जॉर्जियामध्ये सातत्याने घेण्यात आलेल्या नमुन्यांच्या विश्लेषणामध्ये प्रतिकारक जिवाणूंचा प्रादुर्भाव असल्याचे आढळले आहे. अमेरिकी कृषी विभागाच्या कृषी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी अथेन्स (जॉर्जिया) येथील पाण्याच्या कालव्यामध्ये वाढणाऱ्या हानीकारक जिवाणूंची संभाव्य वाढ होण्याच्या स्रोतांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे पाण्याचा दर्जा टिकवणे शक्य होऊ शकते. यासाठी एक प्रकल्प गेल्या वीस वर्षांपासून राबवला जात आहे. त्यात अप्पर ओकोनी पाणलोट क्षेत्रातील पाण्याचे नमुने सातत्याने घेतले जातात. या महत्त्वपूर्ण माहितीसाठ्यातील प्रतिकारकता विकसित केलेल्या जिवाणूंचे (अॅण्टीमायक्रोबियल रेझिस्टंट -AR) पाण्यातील प्रमाण तपासण्यात येते. अशा जिवाणूंच्या अस्तित्त्वाचे सार्वजनिक आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम लक्षात घेतले जात आहेत.    जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी गेल्या दोन वर्षांपासून ४५८ पाण्याच्या नमुने गोळा केले होते, त्यामध्ये ४९६ प्रकारचे इ. कोलाय जिवाणू आढळले. त्यातील ३४ ई. कोलाय जिवाणू प्रजाती या सूक्ष्मजीवविरोधी औषधांना प्रतिकारक असल्याचे आढळले. या ३४ जिवाणूंचे पुढे आणखी विश्लेषण केले असता, त्यातील अनेक प्रजाती पृष्ठभागावरील पाण्यामध्ये सापडतात. या प्रजातीपैकी एक ई. कोलाय एसटी १३१ ही रोगकारक जिवाणू प्रजाती असून, मूत्रनलिकेमध्ये प्रादु्र्भाव करतात. हे कोणत्याही औषधांना दाद देत नसल्याचे आढळले आहे. पाण्यामध्ये जिवाणू आढळत असले तरी क्लोरिन आणि अतिनिल किरणांच्या साह्याने पाण्याचे शुद्धीकरण होत असल्यास भीती बाळगण्याचे कारण असत नाही. मात्र, जिवाणूचे मुळ स्रोत ज्ञान करून घेणे गरजेचे असून, या ठिकाणी त्यांची पैदास होणार नाही, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे फ्रेये यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोहुन चो यांनी पी. एचडीसाठी संशोधन केले असून, त्यांना चारलिन जॅकसन आणि अॅन्ह एनग्युयेन आणि लारी हीओट यांचे साह्य मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT