पत्रांना मिळणार ड्रोनचे पंख
पत्रांना मिळणार ड्रोनचे पंख 
मुख्य बातम्या

पत्रांना मिळणार ड्रोनचे पंख !

सकाळ न्यूज नेटवर्क

परदेशातील कुरिअर सेवेप्रमाणेच ड्रोनद्वारे टपाल किंवा पत्रांचे वहन करण्याच्या निर्णय टपाल खात्याने घेतला आहे. ‘सेगवे’ या बॅटरी डिव्हाइस मशिनद्वारे पत्रे टपाल कार्यालयापर्यंत पाठविण्याचा गांभीर्याने विचार होत आहे. येत्या १५ दिवसांत टपाल कार्यालयात दस्तनोंदणी करारासंबंधीे कामकाजही सुरू  होणार आहे. टपाल खात्याचा पुणे विभाग प्रायोगिक तत्त्वावर ड्रोन आणि सेगवे या सुविधा सुरू करणार असून, त्याचे प्रात्यक्षिक २० जानेवारी रोजी गणेश कला क्रीडामंच येथे भरणाऱ्या ‘महापेक्‍स’ या टपाल तिकिटांच्या संग्रहाच्या प्रदर्शनामध्ये होईल. सुरवातीला अर्धा किलो वजनाची पत्रे ड्रोनद्वारे पाठविण्यात येतील. पोस्टमनला वेळेत टपाल वितरणासाठी सुरवातीला भाडेतत्त्वावर ‘सेगवे’ बॅटरी डिव्हाइस मशिन घेण्यात येतील. महापेक्‍स प्रदर्शनातून स्वारगेट येथील टपाल कार्यालयापर्यंत ड्रोनवरून पत्रे पाठविण्यात येणार आहेत, तर स्वारगेट टपाल कार्यालयापासून सिटी पोस्टापर्यंत ‘सेगवे’द्वारे टपाल पाठविण्यात येईल. या प्रयोगाच्या यशस्वीतेनुसार ड्रोन व सेगवे वापरण्याबाबतचे धोरण आखण्यात येणार आहे. याविषयी बोलताना पुणे विभागाचे पोस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वरकर म्हणाले, की आधुनिक ड्रोन व सेगवेचा वापर करून सेवा-सुविधा पुरविण्याचा वेग वाढवण्यात येईल. दस्तनोंदणीसंबंधी टपाल खात्याने एजन्सी घेतली आहे. त्यामुळे १५ दिवसांत या सुविधेचा लाभ नागरिकांना घेता येईल.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT