अळिंबीप्रमाणे वाढणारे फूल!  
मुख्य बातम्या

अळिंबीप्रमाणे वाढणारे फूल !

वृत्तसेवा

माणसाप्रमाणेच निसर्गामध्ये बहुरुप्यांची कमतरता नाही. विविध रंग रुप घेऊन आपल्या भक्षकाला फसविणे, गाफील ठेवणे किंवा प्रजोत्पादनासाठी प्रयत्न केले जातात. वनस्पतीही परागीकरणासाठी विविध हातखंडे अवलंबत असतात. त्यात कोबे विद्यापीठातील संशोधकांना अळिंबीचा भास निर्माण करणारे फूल आढळले आहे.

दक्षिण जपान येथील कुरोशिमा या बेटावर अस्पिडीस्ट्रा इलेटीओर ही आश्चर्यकारक वनस्पती प्रजाती आढळते. तिची परागीकरणाची पद्धत अन्य फुलांच्या तुलनेमध्ये भिन्न आहे. या वनस्पतीने आपल्या फुलांची रचना एखाद्या अळिंबीप्रमाणे विकसित केली आहे. या वनस्पतींचा शोध कोबे विद्यापीठातील प्रा. स्युत्सूगू केन्जी आणि स्युयोशी मासाहिरो यांनी घेतला आहे. त्यांचा शोध ‘इकॉलॉजी’ या संशोधनपत्रिकेमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे.

अस्पिडीस्ट्रा इलेटीओर ही सामान्यतः ‘कास्ट आयर्न प्लॅंट’ या नावाने ओळखली जाणारी शोभिवंत वनस्पती आहे. जगभरामध्ये वाढत असली तरी तिचे मूळ हे दक्षिण जपान येथील बेटांवर आहे. त्यावर येणारी जांभळी, चमकदार व दिसायला काहीशी अळिंबी प्रमाणे दिसणारी फुले जमिनीवर अर्धवट गाडलेल्या किंवा  पालापाचोळ्यामध्ये झाकलेल्या अवस्थेमध्ये येतात.    अनेक वनस्पती या परागीकरणासाठी मधमाश्या आणि बंबलबीवर अवलंबून असतात. काही वनस्पतींचे परागीकरण अन्य प्राण्यातर्फे होते. उदा. केळीतील काही प्रजातींचे परागीकरण वटवाघळांद्वारे होते.  सुमारे शंभर वर्षापूर्वी अस्पिडीस्ट्रा इलेटीओर वनस्पतीला गोगलगायी सातत्याने भेट देत असल्याचे युरोपातील अभ्यासात प्रथम आढळले. त्यावरून गोगलगायींद्वारे त्यांचे परागीकरण होत असल्याचे मत मान्य झाले. मात्र, गोगलगायी या प्रामुख्याने वनस्पतींसाठी हानिकारक या सदरामध्ये मोडतात.

२००९ मध्ये डासाप्रमाणे दिसणारी ग्नॅटस ही माशी या वनस्पतीला भेट देत असल्याचे दिसून आले. मात्र, हाही वनस्पतींचा हा नैसर्गिक आवास नव्हता. त्यामुळे या वनस्पतीच्या नैसर्गिक आणि मूळ आवासामध्ये गेल्या दोन वर्षापासून अभ्यास केला. फुलांना भेट देणाऱ्या विविध कीटकांच्या नोंदी दिवस रात्र घेण्यात आल्या. यात एकही गोगलगायीने भेट दिली नाही. मात्र, ग्नॅटस या माशीने दिलेल्या भेटीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये परागकणांचे शरीरावर वहन केल्याचे दिसून आले. तिथून पुढे भेटी दिलेल्या अनेक ठिकाणी फळे लागलेली दिसली. त्यावरून खऱ्या अर्थाने या माश्याच अस्पिडीस्ट्रा इलेटीओर या वनस्पतीचे परागीकरण करत असल्याचे स्पष्ट झाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather Today: पूर्व विदर्भात पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम

Farmer Drought Relief: दीड कोटी शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत मिळणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

Fodder Restrictions: चारा टंचाई टाळण्यासाठी वाशीममध्ये सोयाबीन, तूर कुटार विक्रीवर निर्बंध

Turmeric Crop Condition: वाशीममध्ये हळद पीक संकटात; कंदांची वाढ खुंटल्याने उत्पादन घटण्याची भीती

Ethanol Fuel: ई पंच्याऐंशी आणि ई शंभर इंधनावरील वाहनांना केंद्राची परवानगी; मोटार वाहन नियमांत सुधारणा

SCROLL FOR NEXT