Water conservation in Chandwad and Yeola talukas due to Devsane-Manjarpada project 
मुख्य बातम्या

नाशिक :देवसाने-मांजरपाडा प्रकल्पामुळे चांदवड व येवला तालुक्याला जलसंजीवनी 

नाशिक: दुष्काळाच्या खाईत खितपत पडलेल्या चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने देवसाने मांजरपाडा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक: दुष्काळाच्या खाईत खितपत पडलेल्या चांदवड तालुक्याला जलसंजीवनी देण्याच्या दृष्टीने देवसाने मांजरपाडा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला आहे. या भागाला जलसंजीवणी मिळणार असून अधिकचे पाणी मिळण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे अतिरिक्त पाणी  पुणेगाव- दरसवाडी मार्गे येवल्यासोबतच चांदवडमध्ये देऊन हा दुष्काळी भाग सुजलाम सुफलाम करणार आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.            चांदवड येथे रविवार(ता.३०) रोजी पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ.राहुल आहेर, उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, माजी आमदार उत्तम भालेराव, जिल्हा परिषद सदस्य डॉ.आत्माराम कुंभार्डे, शोभा कडाळे, पंचायत समिती सभापती पुष्पा धाकराव, उपसभापती शिवाजी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी उपस्थित होते.  भुजबळ म्हणाले, ‘‘मांजरपाडा प्रकल्पाद्वारे पुणेगाव दरसवाडी कालव्यातून चांदवड तालुक्यातील पाझर तलाव भरले जातील. गुजरातकडे वाहून जाणारे जास्तीत जास्त पाणी आपण पार गोदावरी प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात वळविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.यातून नाशिक जिल्ह्यासोबतच मराठवाड्याची तहान भागविली जाईल.’’            ते म्हणाले, ‘‘चांदवड मधील ६३ किलोमीटर आणि येवल्यातील ८८ किलोमीटर अंतरादरम्यान येणाऱ्या अनेक गावांना या देवसाने प्रकल्पाचा फायदा होणार आहे.हा प्रकल्प येवला व चांदवड तालुक्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरणार आहे. पुणेगाव किमी २६ ते ६३ कालव्याची गळतीचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. हथीयाड-राजदेरवाडी लघु पाटबंधारे योजना प्रस्ताव, काळडोह-केंद्राई धरणाच्या लगत नारायणगाव शिवारात स्थानिक नाल्याच्या सोर्स यास मंजुरी, परसूल ते गंगावे पुणेगाव कालव्याची पाटचारी काढणे, ओझरखेड कालवा-वाहेगावसाळ गोई नदीपासून ते काजळीनदी पर्यंत वाढविणे यासोबतच चांदवड तालुक्यातील इतरही सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहे. काही नव्याने मंजूर करावयाचे आहे. त्यासाठी स्वतः प्रयत्न करून येथील सर्व योजनांची कामे मार्ग लावण्यास कटिबद्ध आहोत.’’   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Road Committee: शेतरस्त्यांसाठी समिती स्थापन करणार : फडणवीस

Mahakrushi App: ‘महाकृषी’ ॲपमुळे कामकाजात पारदर्शकता

APMC Cess Scam: सेस चोरीप्रकरणी ‘पणन’ने अहवाल मागविला

Maize Production: राज्यात यंदा खरिपात मका क्षेत्र वाढीचा अंदाज

Raisin Illegal Import: चीनमधून बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवा

SCROLL FOR NEXT