Solapur: Shut down Siddheshwar in four days
Solapur: Shut down Siddheshwar in four days 
मुख्य बातम्या

सोलापूर ः ‘सिद्धेश्‍वर’चे गाळप चार दिवसांत बंद करा 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः सहवीजप्रकल्प, गाळपक्षमता वाढवणे, बॉयलर उभारणे यासाठी पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी न घेता गाळप सुरू केल्याने कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे उत्पादन येत्या चार दिवसांमध्ये बंद करण्याचे आदेश विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे यांनी दिले आहेत. त्याशिवाय वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या सहवीजप्रकल्पाच्या चिमणीमुळे विमानसेवेत अडथळा येत असल्याबाबत वाद सुरू आहे. स्थानिक प्रशासन ते उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण पोहोचले आहे. पण हा वाद काही केल्या शमत नाही. अलीकडेच नगरविकास खात्याने ही चिमणी पाडण्याबाबत अभिप्राय दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या निर्णयाला महत्त्व आले आहे. तसेच कारखान्याची चिमणी पाडण्याबाबत महापालिकेतर्फे पत्रव्यवहार सुरू आहे. त्यातच आता कारखान्याने गाळप क्षमता वाढवण्यासह, बॉयलर उभारणी, को-जनरेशनसाठी पर्यावरण विभागाची मंजुरी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी कारखान्यास नोटीस बजावली आहे. प्रदूषण नियंत्रण कायद्याचे पालन करण्याबाबत वारंवार दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले.  पूर्वसूचना देऊनही दुर्लक्ष  प्रदूषण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी नुकत्याच केलेल्या पाहणीमध्ये कारखान्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले होते. कारखान्याने गाळपक्षमता अडीच हजार मेट्रिक टनांपेक्षाही जास्त केली. तसेच १० मेगावॉट वीजनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला, उत्पादनक्षमतेच्या संमतीचे उल्लंघन केले. याबाबतच्या नियमिती करण्याबाबत यापूर्वी सातत्याने सूचना देऊनही कारखान्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT