Nashik: Plan with a view to complete crushing of sugarcane: Bhalerao, Joint Director, Sugar 
मुख्य बातम्या

नाशिक : उसाचे संपूर्णपणे गाळप  होईल यादृष्टीने नियोजन करा : साखर सहसंचालक भालेराव

नगर व नाशिक जिल्हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी २०२१-२२ गाळप हंगामासाठी उपलब्ध असलेल्या उसाचे संपूर्णपणे गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी कळविले आहे.

टीम अॅग्रोवन

नाशिक : साखर आयुक्तालयाने दिलेल्या सूचनांनुसार अहमदनगर प्रादेशिक विभागातील नगर व नाशिक जिल्हा सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी २०२१-२२ गाळप हंगामासाठी उपलब्ध असलेल्या उसाचे संपूर्णपणे गाळप होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे प्रादेशिक सहसंचालक (साखर) अहमदनगर मिलिंद भालेराव यांनी कळविले आहे. 

अहमदनगर प्रादेशिक विभागातील सर्व सहकारी व खासगी कारखान्याकडे ऊस उत्पादकांचा नोंदणी न झालेला आणि गाळपास उपलब्ध असलेल्या सर्व उसाचे गाळप होईल याबाबत दक्षता घेण्याबाबत कारखान्यांचे कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, शेतकी अधिकारी, केन मॅनेजर यांना साखर आयुक्तांनी कळविले आहे. ऊस नियंत्रण आदेश १९६६ तसेच महाराष्ट्र साखर कारखाने (क्षेत्र आरक्षण, गाळप आणि ऊसपुरवठा नियमन) आदेश १९८४ मधील तरतुदीनुसार व गाळप परवान्यातील अटीनुसार साखर आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय साखर कारखान्यांनी गाळप हंगाम बंद करू नये. तसेच प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाने याबाबत साखर आयुक्त कार्यालयाने दिलेल्या परिपत्रकीय सूचनांनुसार कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.  पैशाची मागणी होत असल्यास तक्रार करा  सूचना देऊनही ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून ऊसतोडणीकरिता पैशाची मागणी होत असल्यास संबंधित कारखान्याच्या तक्रार निवारण अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. तसेच कोणत्याही ऊस उत्पादकांना ऊसतोडणीसाठी ऊसतोडणी कंत्राटदार, ऊसतोडणी मजूर व कारखाना प्रतिनिधी यांनी पैशाची मागणी केल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करावी, असेही भालेराव यांनी कळविले आहे.  

   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT