Increase in area under Kandebagh banana in Khandesh 
मुख्य बातम्या

खानदेशात कांदेबाग केळीखालील क्षेत्रात वाढ 

जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळी लागवडीखालील क्षेत्रात यंदा किंचित किंवा सुमारे ४०० हेक्टरने वाढ झाली आहे. लागवड सुरूच आहे. एकूण लागवड १२ हजार हेक्टरवर झाली आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात कांदेबाग केळी लागवडीखालील क्षेत्रात यंदा किंचित किंवा सुमारे ४०० हेक्टरने वाढ झाली आहे. लागवड सुरूच आहे. एकूण लागवड १२ हजार हेक्टरवर झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात चोपडा, पाचोरा-भडगाव, जामनेर, धुळ्यात शिरपूर या भागांत कांदेबाग केळीची लागवड केली जाते. जळगावमध्ये रावेर, यावल, मुक्ताईनगर तालुक्यात अपवादानेच कांदेबाग केळी असते. जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात सुमारे पाच ते साडेपाच हजार हेक्टरवर लागवड केली जाते. तर धुळ्यातील शिरपुरात सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवर कांदेबाग केळी असते. शिरपुरात सुमारे १०० ते १२५ हेक्टरने कांदेबाग केळीखालील क्षेत्र वाढले आहे. तर चोपडा, जळगावात मिळून सुमारे ३०० हेक्टरने कांदेबाग केळीखालील क्षेत्र वाढले आहे. जळगाव तालुक्यात एकूण १५०० हेक्टरवर कांदेबाग केळी लागवड होईल. लागवड अंतिम टप्प्यात आहे. सध्या उशिराच्या कांदेबागांची लागवड सुरू आहे. पण पुढील सात ते आठ दिवसात ही लागवड पूर्ण होईल. 

कांदेबाग केळी लागवडीसाठी यंदा रोपांचा वापरही अधिक झाला आहे. जळगाव, चोपडा, जामनेर, शिरपूर तालुक्यांत रोपांचा वापर वाढला आहे. यंदा केळीला सरासरी दर १००० रुपये प्रतिक्विंटल, असा अपेक्षित आहे. कमी दर्जाच्या केळीच्या दरात मात्र मोठे चढउतार यंदा झाले आहेत. यामुळे काही शेतकऱ्यांना फटकाही बसला आहे. पण केळी पीक इतर पिकांच्या तुलनेत बागायतदारांना परवडते, असे शेतकरी मानतात. कापूस, कांदा, भाजीपाला पिके परवडत नाहीत. नुकसान होत आहे. उसाची लागवड केली तर कारखाने तोडणी करीत नाहीत. यामुळे केळीलाही चोपडा, जामनेर, पाचोरा, जळगाव, शिरपूर आदी भागात पर्याय नसल्याने केळीची लागवड वाढत आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT