Cotton Market | Cotton Farmer | Cotton Production
Cotton Market | Cotton Farmer | Cotton Production  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस बाजार टिकेल का?

अनिल जाधव

Cotton Market : जगात यंदा महत्त्वाच्या कापूस उत्पादक (Cotton Farmer) देशांमध्ये पिकाला कमी पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाचा (Drought) फटका बसला. परिणामी, अमेरिकेच्या कृषी विभागाने (Agriculture Department) यंदा जागतिक कापूस उत्पादनाचा (Cotton Production) अंदाज यंदा वाढवला आहे. मागील हंगामात म्हणजेच २०२१-२२ मध्ये जगात कापसाचे एकूण उत्पादन १ हजार ४६० लाख गाठींवर झाले होते. मात्र यंदा उत्पादन १८ लाख गाठींनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यंदाचे कापूस उत्पादन १ हजार ४७८ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज आहे. जागतिक कापूस उत्पादनाचा विचार करता २०२०-२१ पासून सलग दुसऱ्या वर्षी घट झाली आहे.

यंदा जागतिक कापूस उत्पादन वाढणार आहे. मात्र जागतिक कापूस वापर कमी होईल, असं यूएसडीएने म्हटले आहे. मागील हंगामात जगात १ हजार ४९० लाख गाठी कापसाचा वापर झाला होता. मात्र यंदा कापूस वापर १ हजार ४१८ लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जागतिक वापर (लाख गाठी)

वर्ष उत्पादन वापर

२०२२-२३ १,४७८ १,४१८

२०२१-२२ १,४६० १,४९०

२०२०-२१ १,४१४ १,५६३

२०२०-२१ १,५५२ १,३१७

२०१८-१९ १,५१७ १,५४१

चीन,भारत उत्पादनात पुढे

चीन भारतापेक्षा जास्त कापूस उत्पादन घेतो. सध्या एकूण जागतिक कापूस उत्पादनात चीनचा वाटा २५ टक्क्यांवर आहे. त्यानंतर भारतही याचदरम्यान उत्पादन घेतो. अमेरिका १२.६९ टक्के कापूस उत्पादित करतो.

विविध देशांचा जागतिक

उत्पादनातील वाटा (टक्के)

चीन २५

भारत २४.६१

अमेरिका १२.६९

ब्राझील ११.६३

ऑस्ट्रेलिया ४.४४

टर्की ४.३७

इतर १७.२६

देशनिहाय उत्पादन

तसेच भारतातही यंदा कापूस लागवड वाढली होती. गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावही यंदा कमी प्रमाणात जाणवला. त्यामुळे यंदा यूएसडीएने भारतातील कापूस उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र यूएसडीएच्या भारतातील उत्पादनाविषयीचा अंदाज चुकीचा ठरणार आहे. कारण यंदा भारतातील उत्पादन कमीच असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

देशनिहाय कापूस वापराची स्थिती

अमेरिकेच्या कृषी विभागाने यंदा चीन वगळता महत्वाच्या कापूस वापरकर्त्या देशांचा वापर कमी होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. चीनचा कापूस वापर यंदाही वाढून मागील वर्षीच्या ४४४ लाख गाठींवरून ४५० लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. तर भारतातील कापूस उत्पादन ३१७ लाख गाठींवरून २९२ लाख गाठींवर स्थिरावण्याचा अंदाज आहे. यासोबतच यंदा पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि टर्की या देशांमधील कापूस वापरही कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशांचा कापूस वापर (लाख गाठी)

देश २०२१-२२ २०२२-२३

चीन ४४४ ४५०

भारत ३१७ २९२

पाकिस्तान १३५ ११४

बांगलादेश १०७ १०४

व्हिएतनाम ८५ ८२

टर्की ११० १०१

कोणत्या देशांमधील उत्पादन घटणार?

पाकिस्तानमध्ये यंदा पुराचा फटका महत्वाच्या पंजाब आणि बलुचिस्तान या राज्यांना बसला. त्यामुळे यंदा पाकिस्तानमधील कापूस उत्पादन २९ लाख गाठींनी घटणार आहे. मागील हंगामात पाकिस्तानमध्ये ७६ लाख गाठी कापूस उत्पादन हाती आले होते. ते यंदा ४७ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाजही यूएसडीएने व्यक्त केला.

भारताविषयीचा अंदाज

तसेच काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयनेही यंदाच्या हंगामातील कापूस उत्पादनाच्या अंदाजात कपात केली आहे. पुढील काळातही सीएआय उत्पादनाचा अंदाज कमी करेल, असं जाणकार सांगत आहेत. कारण दरवर्षी असंच घडत असते. मागील हंगामात सीएआयने ऑक्टोबर २०२१ मध्ये देशात ३६० लाख गाठी कापूस उत्पादन होईल असा अंदाज व्यक्त केला होता.

एक कापूस गाठ १७० किलो रुईची असते. नंतर उत्पादन ३३५ लाख गाठींवर स्थिरावेल, असे म्हटले होते. पण त्यानंतर अंदाज सतत बदलत ३२५ लाख गाठी, नंतर ३१५ आणि शेवटी ३०७ लाख गाठी कापूस उत्पादन झाल्याचे सीएआयने स्पष्ट केले. यंदाही हंगामाच्या आधी सीएआयने ३७५ लाख गाठींपर्यंत कापूस उत्पादन वाढेल, असे म्हटले होते. ऑक्टोबरमध्ये ३६५ वरून ३४३ लाख गाठींवर सीएआयचा अंदाज आला. तर ताज्या अंदाजानुसार सीएआयनं ३३९ लाख टन उत्पादन होईल, असं म्हटलंय.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात चढ-उतार का?

याचा परिणाम कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होत आहे. तर अमेरिकेची मागील आठवड्यात कापूस निर्यात कमी झाली. तसेच पाकिस्तानची आयातही थांबली आहे. भारतातील शेतकऱ्यांनी कापूस रोखून धरला, याचा परिणाम कापसाच्या आंतरराष्ट्रीय बाजारावर होताना दिसत आहे.

महाराष्ट्राची स्थिती

दरवर्षी सीएआय आपला अंदाज कायम ठेवत नाही. त्यामुळं यंदाही कापूस उत्पादन गेल्या वर्षीएवढंच राहील, असा अंदाज आहे. सीएआयने आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि हरियानात कापूस उत्पादन कमी झाल्याचं सांगितलं. मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उत्पादन वाढल्याचा अंदाज व्यक्त केला. पण महाराष्ट्रातील शेतकरी वेगळंच सांगतात. उत्पादकता यंदा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

वापर, निर्यात स्थिती

सीएआयने देशातील कापूस वापर १८ लाख गाठींनी कमी होऊन ३०० लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला. तसेच निर्यात मागील हंगामातील ४३ लाख गाठींवरून ३० लाख गाठींवरच स्थिरावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सीएआयच्या या आकड्यांच्या आधारे बाजारात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र कापसाचा वापर आणि निर्यात नंतर वाढूही शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला.

देशनिहाय उत्पादनाचा अंदाज

(लाख गाठी)

देश उत्पादन

चीन ३५५

भारत ३४९

अमेरिका १८०

ब्राझील १६५

ऑस्ट्रेलिया ६३

टर्की ६२

काय राहू शकते चित्र?

त्यामुळं मागणी आणि पुरवठा समीकरण बरोबरीत येईल, अशी शक्यता होती. परिणामी, परिस्थिती सुधारेल तसा कापूस वापरही वाढत जाईल, असा अंदाज होता. भारतातही कापूस उत्पादन वाढीचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र शेतकऱ्यांनी यंदा उत्पादन घटल्याचे सांगितले. तसेच देशात मागील हंगामातील शिल्लक साठा निम्म्यापेक्षाही कमी होता. म्हणजेच कापसाचा एकूण पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा कमी राहणार आहे.

तरी सध्याच्या कापूस दरात फार मोठी घसरण दीर्घकाळासाठी होईल, असे वाटत नाही. सध्या कपासाला सरासरी ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळत आहे. मात्र कोरोना वाढलाच तर शेतकऱ्यांना सरासरी किमान ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळू शकतो. तर कोरोनाची परिस्थिती कमी झाली तर किमान सरासरी ९ हजार रुपयांच्या दरम्यान शेतकऱ्यांना दर मिळू शकतो, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकार व्यक्त करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT