Cotton Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Market : कापूस दर आणखी नरमतील का?

काल आंतरराष्ट्रीय बाजारात २ टक्क्यांची नरमाई आली होती. तसंच आज दुपारपर्यंत दर खालच्या पातळीवर होते. त्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावर जाणवला.

Team Agrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापूस बाजारात (Cotton market) तेजी मंदी होती. याचा परिणाम देशातील कापूस बाजारावरही जाणवत आहे. आज देशातील कापूस दरात (Cotton Rate) नरमाई पाहायला मिळाली. त्यामुळं कापूस उत्पादकांची धाकधुकी वाढली. तर बाजारात संक्रांतीनंतर कापूस आवक वाढेल, अशी चर्चा आहे. याचाही परिणाम कापूस बाजारावर दिसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरातील तेजी मंदी कायम आहे. काल कापूस दरात जवळपास २ टक्क्यांची नरमाई आली. त्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावरही पाहायला मिळाला. काल कापसाचा बाजार ८६.२९ सेंट प्रतिपाऊंवर खुला झाला होता. रुपयात सांगायचं झालं तर हा दर १५ हजार ५३७ रुपये प्रतिक्विंटल होतो. तर दिवसभर बाजारात चढ उतार होत ८४.४६ सेंटवर बाजार बंद झाला होता. म्हणजेच काल १५ हजार २०७ रुपये क्विंटलवर व्यवहार बंद झाले.

आज मात्र कापूस वायद्यांमध्ये वाढ झाली. आजही दरात दिवसभर चढ उतार होते. मात्र सायंकाळी साडेपाच वाजता कापूस दरानं ८५.७५ सेंटचा टप्पा गाठला. रुपयात सांगायचं झालं तर हा दर १५ हजार ४४० रुपये क्विंटलवर कापूस दर पोचला.

काल आंतरराष्ट्रीय बाजारात २ टक्क्यांची नरमाई आली होती. तसंच आज दुपारपर्यंत दर खालच्या पातळीवर होते. त्याचा परिणाम देशातील कापूस बाजारावर जाणवला. आज अनेक बाजारात कापूस दर क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांपर्यंत नरमले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील नरमाई आणि देशातील कापूस विक्रीविषयीच्या चर्चेचा बाजारावर परिणाम झाल्याचं सांगितलं जातं.

काय बाजारात चर्चा
शेतकरी संक्रांतीनंतर कापूस विक्री वाढवतील, अशी चर्चा बाजारात सुरु आहे. शेतकरी दरवाढीची वाट संक्रांतीनंतर पाहणार नाहीत, असं सध्या सांगितलं जातंय. पण शेतकरी प्रत्यक्ष कापूस विकत नाहीत, तोपर्यंत काही खरं नाही. मात्र याचा मानसिक परिणाम कापूस दरावर होताना दिसतोय. त्यामुळं कापूस दर काहीसे कमी झाले.

आजची दरपातळी
आज देशातील बाजारात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ८ हजार ३०० ते ८ हजार ९०० रुपये दर मिळाला. अनेक बाजारातील किमान दर आज ८ हजार रुपयांच्या खाली आले होते. राज्यातही कमाल दर काहीसा कमी झाला. पण दर कमी झाल्यानं आज बाजारातील आवक खूपच कमी झाली. त्यामुळं दरात फार मोठ्या मंदीची शक्यता नाही.

काय राहू शकते दरपातळी?
शेतकऱ्यांनी बाजारातील कापूस आवक मर्यादीत ठेवल्यास कापूस दराची पातळी ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो. शेतकरी सरासरी ९ हजार रुपयांचं टार्गेट ठेऊ शकतात. मात्र दरात चढ उतारही राहतील, हे ध्यानात असू द्यावं, असं आवाहनही कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Azolla Cultivation: अझोलाचे उत्पादन कसे करावे?

Indian Agriculture 2025: थंडी यंदा रब्बी पिकांना असह्य होण्याचा धोका; IMDच्या अपडेटनंतर ICAR अलर्टवर!

APMC Farmer Facility : शेतीमाल आणणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत जेवणाचे पास ः सूर्यकांत पाटील

Cabinet Decision: मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वाचे निर्णय; शेतकरी भवनांसाठी १३२ कोटींचा निधी तर आधुनिक संत्रा केंद्र उभारणीसाठी मुदतवाढ

Maharashtra Weather Update : राज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT