soybean rate  agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : नवं सोयाबीन कशामुळं दबावात आलं?

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात आठवडाभरातच जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली. बुर्सा मलेशियावर मागील आठवड्यात किमान ३ हजार २०० रिंगीट प्रतिटनाच्या पातळीवर असलेल्या पामतेलाने आता ४ हजार १०० रिंगीटचा टप्पा गाठलाय.

टीम ॲग्रोवन

पुणेः दिवाळीसाठी शेतकरी सोयाबीनची विक्री (Soybean Sale) करत असल्यानं बाजारात आवक (Soybean Arrival) वाढली. त्यातच सणांमुळं मागणी (Soybean Demand) वाढल्यानं सोयातेलाचे दर (Soya Oil) सुधारले. मात्र हंगाम सुरु होऊनही सोयाबीनचे दर मात्र काहीसे स्थिर असल्याचं दिसतं.

आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाच्या दरात आठवडाभरातच जवळपास २० टक्क्यांनी वाढ झाली. बुर्सा मलेशियावर मागील आठवड्यात किमान ३ हजार २०० रिंगीट प्रतिटनाच्या पातळीवर असलेल्या पामतेलाने आता ४ हजार १०० रिंगीटचा टप्पा गाठलाय. पामतेलाच्या दरात वाढ होत असल्यानं इतरही तेलाचे दर सुधारले आहेत.

सोयाबीन तेलाचे दरही जवळपास १० टक्क्यांनी वाढले. सीबाॅटवर सोयातेलाचे दर मागील आठवाड्यातील निचांकी ६४.४२ सेंट प्रतिपाऊंडवरून ७०.१९ सेंटवर पोचले. देशातही सोयाबीन तेलाचे दर लिटमागं जवळपास १० रुपयाने वाढले.

सोयाबीन तेल सुधारलं तरी सोयाबीनचे दर वाढत नसल्याची चर्चा आहे. मात्र सध्या देशात नवं सोयाबीन बाजारात येतंय. तसचं या सोयाबीनमध्ये ओलावा अधिक आहे. त्यामुळं नव्या सोयाबीनला कमी दर मिळतोय.

मात्र एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनचे दर मागील आठवड्यापासून २०० रुपयांपर्यंत सुधारलेले दिसतात. एफएक्यू दर्जाचं सोयाबीन किमान ५ हजार रुपयांच्या पुढेच विकलं जातंय. तर ओलावा आणि डागी, काडीकचरा जास्त असलेल्या सोयाबीनचे दर दबावात आहेत, असं जाणकारांनी सांगितलं.

सोयाबीन प्रक्रिया उद्योगही गरजेप्रमाणं सोयाबीन विकत घेतोय. सध्या सोयातेलाला मागणी असली तरी प्रत्यक्ष मागणी प्रमाणं उद्योग गाळप करत आहेत. वायदे बंद असल्यानं मिल्सना तेलाचे भविष्यातील सौदे करता येत नाहीत.

वायदे सुरु असते तर मिल्सनी जास्त सोयाबीन गाळप करून वायद्यांमध्ये तेलाची विक्री केली असती. मात्र आता मागणीप्रमाणं गाळप केलं जातंय. परिणामी मिल्स हात राखूनच खरेदी करत आहेत. त्याचाही दबाव नव्या सोयाबीनवर येतोय.

याचा गैरफायदा काहीजण घेत आहेत. शेतकऱ्यांना सध्या आहे त्यापेक्षा जास्त ओलावा, डागी असल्याचं सांगून कमी दर देण्याचं कारस्थान सुरु आहे. पावसामुळं शेतकऱ्यांनाही नक्की गुणवत्तेचा अंदाज लावण अवघड जातंय.

त्यातच दिवाळीची गरज असल्यानं शेतकरीही विक्री करत आहेत. मात्र याही परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीनचा ओलावा, डागी आणि काडीकचरा याचे योग्य व्यवस्थापन करून विक्री करावी.

नवं सोयाबीन वाळवून विकल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकतं. सध्या बाजार ५ हजार ते ५ हजार २०० रुपयांच्या दरम्यान आहे. मात्र शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस ५ हजार ते ५ हजार ५०० रुपये ही दर पातळी लक्षात ठेऊन एफएक्यू दर्जाच्या सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT