Wheat Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat : सणांमध्ये गहूदर आणखी सुधारणार

मागील दोन वर्षांत खाद्यतेल दराने विक्रमी टप्पा गाठला होता. आता खाद्यतेलांचे दर आटोक्यात येत असताना गहू भाव खात आहे. सणांच्या काळात गहू, गहू पीठ, रवा आणि मैद्याच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे ः मागील दोन वर्षांत खाद्यतेल दराने (Edible Oil Rate) विक्रमी टप्पा गाठला होता. आता खाद्यतेलांचे दर आटोक्यात येत असताना गहू भाव (Wheat Rate) खात आहे. सणांच्या काळात गहू, गहू पीठ, रवा आणि मैद्याच्या भावात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.

गहू हे देशाचे मुख्य धान्य. जगात गहू उत्पादनात भारत पहिल्या पाचमध्ये असतो; मात्र वापरही तेवढाच होतो; मात्र यंदा गणिते बदलली. यंदाचे मार्च आणि एप्रिल महिने १२२ वर्षांतील अतिउष्ण ठरले. यामुळे गहू उत्पादन घटले. सरकारच्या ध्यानात ही गोष्ट येईपर्यंत देशातून ७५ लाख टनांच्या दरम्यान निर्यात झाली. ही निर्यात विक्रमी ठरली.

रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत गव्हाची टंचाई होती. भारत सरकारनेही देशातील अतिरिक्त गव्हाचे साठे करण्याची नामी संधी समजत या संधीचे सोने करण्याचे ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भारत जगाची भूक भागवेल’, असा संदेश द्यायला सुरुवात केली.

मात्र प्रत्यक्ष स्थानिक बाजारांमध्ये चित्र वेगळे होते. गव्हाला मागणी वाढल्याने खासगी खरेदी वाढून सरकारची खरेदी कमी झाली. गेल्या हंगामात सरकारने ४४३ लाख टन गहू खरेदी केला होता; मात्र यंदा केवळ १८८ लाख टनांचीच खरेदी करता आली. गहू खरेदी कमी झाल्याने रेशनिंग आणि पंतप्रधान गरीब कल्याण योजनांमधून वितरणाचीही चिंता निर्माण झाली. त्यामुळे आधी सरकारने गहू निर्यातबंदी केली आणि नंतर गहू पीठ, रवा आणि मैदा निर्यातीसाठी सरकारची परवानगी बंधनकारक केली.

तरीही देशातील सर्वच बाजारांमध्ये गव्हाचे दर वाढतच राहिले. गेल्या आठवडाभरात गहू दर क्विंटलमागे सरासरी १०० रुपयांनी वाढले. गव्हाचा सरासरी भाव सध्या २५५० रुपये ते २६०० रुपयांवर पोहोचलाय. तर आज मध्य प्रदेशात गव्हाला प्रतिक्विंटल २५५० रुपये दर मिळाला. तर राजस्थानमध्ये २६०० रुपयांनी गव्हाचे व्यवहार झाले. गव्हाचे वाढते दर बघता सरकार आयातीला परवानगी देईल, असा अंदाज व्यक्त होत होता; मात्र देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा दावा करत, गहू आयात करण्याची गरज नाही, असे सरकारने नुकतेच स्पष्ट केले; मात्र सरकाच्या या स्पष्टीकरणानंतर गव्हाचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

स्टॉकिस्टकडून कृत्रिम तुटवड्याची शक्यता

सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सण आहेत. सणांच्या काळात गहू पीठ, रवा आणि मैद्याला जास्त मागणी असते; मात्र गहू महाग असल्याने पीठ गिरण्यांना गहू आयातीची आशा होती. दरवाढीच्या अपेक्षेने स्टॉकिस्ट गव्हाचा साठा बाहेर काढत नव्हते. त्यातच आता सरकारनेही आयातीला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गव्हाचे दर आणखी वाढतील. स्टॉकिस्ट नफेखोरीसाठी बाजारात गव्हाचा तुटवडा निर्माण करून जास्तीत जास्त दर वाढवतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. मागणी असल्याने पीठ गिरण्या महाग गहू खरेदी करून प्रक्रिया करतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT